Posts

Showing posts from August, 2025

Happy Life आनंदी जीवन भाग 12

 *आनंदी जीवन_पक्षांचा संदेश*  प्रत्येक व्यक्ती आपल्या काही सिद्धांतानुसार, विचारणानुसार, विचारप्रणालीनुसार जीवन जगत असतो .जीवन जगत असताना प्रत्येकाचे काही आदर्श, विचार ,संस्कृती मूल्ये व या मूल्य संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आचरण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने जीवन जगत असताना प्रत्येकाची एकच उद्दिष्ट असते की मला आनंदी जीवन जगायचे आहे. माझे जीवन जगण्याचा उद्देश हा इतरांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. परोपकार करणे हा जीवन जगण्याचा हेतू उद्देश असला पाहिजे.आहे . आपले मानवी शरीर हे इतरावर परोपकार करण्यासाठीच आहे. संतांनी सुद्धा आपणास परोपकार करावा असा संदेश दिलेला आहे .परंतु आज मानवाने आपल्या जीवनामध्ये  लोभीपणाचा अंगीकार केलेल्या असल्यामुळे प्रत्येक जण परोपकार करण्याच्या भानगडीत न पडता स्वतःचा स्वार्थ कसा साधता याचा विचार करत आहे.  सुखी समाधानी आनंदाने जर आम्हाला जीवन जगायचे असेल या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल असे म्हटले जाते की तूच तुझ्या भाग्याचा शिल्पकार आहेस. कर्म करो  तो फल मिलता है lआज नही तो कल मिलता है lजितना गहरा अधिक हो कुआ l उतना मीठा जल मिलता है lआम्ह...

Happy Marriage Life

               *हॅपी मॅरेज लाईफ* पती-पत्नी ही संसार रुपी रथाचे दोन चाके आहेत. पती-पत्नी नाते हे अतिशय पवित्र विश्वासाचे, प्रेमाचे प्रतीक मानले जाते .संसार करत असताना पती-पत्नीचे नाते हे एकमेकाला समजून घेणारे असणे अत्यंत आवश्यक आहे .पती-पत्नीच्या नात्यांमध्ये जर बेबनाव असेल ,ताणतणाव असेल, विश्वासार्हता नसेल तर पती-पत्नी या नात्यांमध्ये वितृष्ट निर्माण होते व विनाकारण गृहकलह निर्माण होतो व या गोष्टीचा शेवट तान तणाव, चिंता, इर्षा या गोष्टींमध्ये होत असते. म्हणून पती आणि पत्नीने एकमेकांना समजून घेऊन जीवन जगणे अत्यंत महत्त्वाचे असते .पती-पत्नीमध्ये विनाकारण होत जाणारे भांडण हे सुखी संसारासाठी योग्य गोष्ट नसते .जुन्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती. संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे पती-पत्नीमध्ये जरी काही कारणास्तव बेबनाव झाला तरी घरातील जेष्ठ मंडळी ,मोठी मंडळी या नात्याला सावरून घ्यायचे. त्यांच्यातील गैरसमज दूर करायचे .परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेले आहे .नवरा बायको व दोन मुले एवढेच सुखी संसाराची व्याख्या लोकांची बनलेली आहे. याचा परिणाम असा...

आनंदी जीवन (भाग 10)

 आनंदी जीवन हॅपी लाईफ  जीवन सुंदर आहे जगणं सुंदर आहे. जीवन आनंदी आहे फक्त गरज आहे ती जीवनातील सुखाचे आनंदाचे प्रसंग ओळखून मिळणारा जीवनातील आनंद घेणे व आपले मिळालेले जीवन आनंदाने भरभरून जगणे. अध्यात्मानुसार असे सांगितले जाते की 84 लक्ष कोटी योनी झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मनुष्य जन्म मिळत असतो. प्रत्येक व्यक्तीला मिळालेला हा नरदेह अतिशय दुर्लभ आहे असे म्हटले जाते. त्यामुळे मिळणारा हा नरदेह अतिशय दुर्मिळ आहे त्यामुळे या शरीराचे महत्त्व प्रत्येकाने ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. करोडो रुपयांचा हा नरदेह मानवास जरी मिळालेला असला तरी अनेक लोक व्यसनाच्या आहारी जाऊन या शरीराचे नुकसान करत आहे. व्यसनाधीनता ही मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निर्व्यसनी राहून मिळालेले जीवन आनंदाने जगणे अत्यंत आवश्यक आहे .अन्यथा अनेक रोगांचा बळी पडलेले आपले शरीर केवळ  व्यसनाधीनतेमुळे क्षतीग्रस्त झालेली आपणास दिसून येईल. त्यामुळे निरोगी शरीर राखणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे .आनंदी सुखी जीवन जगण्याची पंचसूत्री पुढीलप्रमाणे सांगता येते.  1)मुलांना योग्य आहार ,संस्कार ...

आनंदी जीवन (भाग नऊ)

                आनंदी जीवन प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये आनंद हवा असतो .प्रत्येकाला आपले जीवन हे आनंदी ,स्वच्छंदी, मनसोक्त जगता यावे अशी अपेक्षा असते .यामुळे प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये आनंदाच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार करत असतो. विविध विचार, वेगवेगळे कौशल्य या अनुषंगाने प्रत्येक जण आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगण्यासाठी काही सूत्रांचीआपणास जीवनात अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे .यास आपण सुखी जीवनाची आनंदी जीवनाची पंचसूत्री असेही म्हणू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो त्या व्यक्तीच्या जीवनात सुखी जीवनाचा आनंद घेता येतो . संत रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहेl विचारी मना तुची शोधूनी पाहेllम्हणून ती पंचसूत्री पुढीलप्रमाणे *1)उत्पन्नानुसार खर्च करा* आधुनिकीकरणाच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये वेगवेगळ्या सुख- सुविधा ,भौतिक सुविधा यांची आवश्यकता भासत आहे .या भौतिक सुख सुविधा यांच्या अनुषंगाने प्रत्येक...

यशस्वी पालकत्व भाग आठ

   मुले हट्टी होण्यास पालकच जबाबदार आधुनिकीकरणाच्या युगामध्ये सोशल मीडिया हा संवादाचे प्रमुख माध्यम बनला आहे. सोशल मीडियामध्ये फेसबुक इंस्टाग्राम, व्हाट्सअप यासारखे विविध माध्यमे संपर्क साधण्यास उपयुक्त ठरत असलेली आपणास दिसून येतात. 21 व्या शतकामध्ये जनसंपर्काची वेगवेगळी साधने निर्माण झालेली आपणास दिसून येतात. पूर्वीच्या काळी पोस्टाने येणारे पत्र आता राहिलेले नाही कारण एका सेकंदामध्ये आपण एका ठिकाणाहून कितीही दूर अंतरापर्यंत संदेश पाठवू शकतो. आज मुले खूप हट्टी होत आहेत. मुले चिडचिड करतात. मुलांचा हट्टीपणा, मुलाचा चिडचिडेपणा पालकांच्या ताणतणावांमध्ये भर घालत आहे .आज मुले अशी का वागत आहेत? मुलांचा हट्टीपणा का वाढलेला आहे? मुलांमध्ये तान तणाव का निर्माण होत आहे? मुलांना मोबाईलचे व्यसन का लागलेले आहे ?या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात येते की या सर्व गोष्टीला पालकच जबाबदार आहेत किंबहुना या सर्व गोष्टीच्या पाठीमागे पालकच कारणीभूत आहेत .कारण ज्यावेळेस छोटा मुलगा रडत असतो ,छोटा मुलगा जेवण करत नसतो , छोटा मुलगा आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करत असतो, त्यावेळे...

HAPPY LIFE आनंदी जीवन भाग 7

 Happy Life.... आनंदी जीवन (भाग सात) प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद हवा असतो .हा आनंद मिळविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो .प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे .परंतु हा आनंद कुठे मिळतो? आनंद कसा घ्यावा लागतो ?आनंद कसा वाटावा लागतो ?आनंद कसा सांभाळावा लागतो? व मिळणारा आनंद अत्तराच्या कुपीमध्ये जसे अत्तर ठेवले जाते आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो अगदी त्याचप्रमाणे हा अत्तर रुपये आनंद सुद्धा आम्हाला आमच्या मनाच्या गाभारारुपी कुपीमध्ये साठवावा लागतो व त्याचा सुगंध हा आमच्या कर्तव्यरुपी कीर्तीने सर्वत्र दरवळत असतो .त्यामुळे मिळणारा हा आनंद हा आम्हाला टिकवता आला पाहिजे ,सांभाळता आला पाहिजे. तो शोधता आला पाहिजे .संत रामदास स्वामी म्हटले आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे lविचारी म्हणा तूच शोधूनी पाहेll जगामध्ये सर्व सुखी असा कोणीही नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या आहेत .वास्तविक पाहता जीवन म्हणजे हे समस्यांचं माहेरघर आहे. जीवनामध्ये अनेक समस्या असतात, अडथळे असतात. परंतु जीवनामध्ये कोणती समस्या अत्यंत महत्त्वाची व कोणत्या समस्येचा ताणतणाव घेतला पाहिजे. याचा आपण विचार ...

यशस्वी पालकत्व मोबाईल मुळे बालपण हरवले (भाग पाच)

    यशस्वी पालकत्व  ( भाग पाच )   *मोबाईलमुळे बालपण हरवले*  आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे.असे कोणतेही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही .नवनवीन तंत्रज्ञान ,नवनवीन होणारी क्रांती ,नवीन होणारे बदल व या बदलाला अनुसरून मानव आपले जीवनमान बदलत आहे. आज प्रत्येकाची जीवनमानाचा दर्जा उंचावलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधीजींच्या विचारसरणीनुसार साधी राहणी व उच्च विचारसरणी ही जीवनशैली होती .परंतु स्वातंत्र्यानंतर पाश्चातीकरणाची अंधानुकरण करण्याची पद्धती ,लोकांचा उत्पन्नाचा वाढता स्त्रोत ,देवाण-घेवाण तंत्रज्ञान यामध्ये झालेली लक्षणीय क्रांती यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले असल्यामुळे आज पाश्चातीकरण संस्कृती अंगीकारली जात आहे .आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली असल्यामुळे प्रत्येक जण  स्पर्धेमध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहे. ज्याप्रमाणे डायनासोर हे नष्ट झाले अगदी त्याचप्रमाणे मानव आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करत असताना दिसतो आहे .आज सोशल मी...

यशस्वी पालकत्व (भाग चार)

              *यशस्वी पालकत्व*भाग चार  पालकत्व ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे .यशस्वी पालकत्व म्हणजे आपण आपल्या पाल्याला देशाचा उत्तम नागरिक घडविण्यासाठी मदत करणे होय .आपल्या बालकाच्या चारित्र्याचा सर्वांगीण विकास साधून त्याच्यामध्ये शारीरिक ,मानसिक भावनिक, बौद्धिक अध्यात्मिक विकास करणे जेणेकरून या देशाचा जबाबदार नागरिक चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते आणि यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करणे आवश्यक असते .यासाठी प्रत्येक पालकांनी काय करावे या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी विषयी आपण चर्चा करणार आहोत *1) पालकांनी पाल्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नये* प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याचे भावनिक सुसंवाद साधून भावनिक नाते निर्माण करणे अत्यंत आवश्यक असते .यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नये बालक हे सुसंस्कारक्षम व या त्याच्यावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे जसे एखाद्या रिकाम्या जागेमध्ये जर आपण काही पेरणी केली नाही त...

यशस्वी पालकत्व 7 STEPS भागतीन

 *यशस्वी पालकत्व...7 STEPS भाग तीन * मुलांचे संगोपन करणे मुलांचे पालन पोषण करणे ही आदर्श पालकत्वाची एक महत्वपूर्ण जबाबदारी असते. मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करून त्याला आदर्श नागरिक घडविणे मुलांना एक जबाबदार नागरिक घडविणे हे पालकांचे आद्य कर्तव्य असते .मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा खूप मोठा वाटा असतो .मुलांचा आदर्श जडणघडणीमध्ये आई व वडील या दोघांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. मुलांचे शिकणे आनंददायी झाले पाहिजे यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते .पालक आणि मुले यांच्यामध्ये सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक असते कारण जोपर्यंत पालक व मुले यांच्यामध्ये सुसंवाद असणार नाही तोपर्यंत विचारांची देवाणघेवाण होणार नाही मुलांच्या अडचणी समस्या मुले बालकाकडे स्पष्टपणे बोलू शकणार नाहीत व जोपर्यंत मुलांच्या अडीअडचणी समस्या पालकांना समजणार नाही तोपर्यंत अडीअडचणीवर कशा पद्धतीने मात करता येईल हे पालकांचे लक्षात येणार नाही म्हणून पालक व मुले यांच्यामध्ये भावनिक सुसंवाद निर्माण होणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी सात पायऱ्या पुढील प्रमाणे सांगता येतील *1)मुलाकडे पाहून स्मितहास...

यशस्वी पालकत्व भाग दोन

              *यशस्वी पालकत्व*  करील मनोरंजन जो मुलांचेl नाते जडेल तयाशी प्रभुचे llअसे सानेगुरुजी नेहमी सांगत. मुलांचे मनोरंजन करून मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करून भारताच्या उज्वल भविष्यासाठी भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी चांगल्या प्रकारचा नागरिक घडविणे हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.   भारतामध्ये इंग्रजांनी पहिल्यांदा कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती अमलामध्ये आणली. परंतु कालपरत्वे स्वातंत्र्यानंतर भारताला सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून 1968 मध्ये भारताचे पहिले शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1986 मध्ये भारताचे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले व 2020 मध्ये म्हणजे तब्बल 34 वर्षानंतर भारताच्या महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकत असताना तिसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जाहीर करण्यात आले. के .कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली व या समितीच्या सूचनेनुसार भारताचे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यासाठी. 484 पानाचा मसुदा के. कस्तुरीरंगन या समितीने सर...

यशस्वी पालकत्व

              *यशस्वी पालकत्व*  करील मनोरंजन जो मुलांचेl नाते जडेल तयाशी प्रभुचे llअसे सानेगुरुजी नेहमी सांगत. मुलांचे मनोरंजन करून मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करून भारताच्या उज्वल भविष्यासाठी भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी चांगल्या प्रकारचा नागरिक घडविणे हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.   भारतामध्ये इंग्रजांनी पहिल्यांदा कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती अमलामध्ये आणली. परंतु कालपरत्वे स्वातंत्र्यानंतर भारताला सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून 1968 मध्ये भारताचे पहिले शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1986 मध्ये भारताचे दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले व 2020 मध्ये म्हणजे तब्बल 34 वर्षानंतर भारताच्या महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकत असताना तिसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जाहीर करण्यात आले. के .कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली व या समितीच्या सूचनेनुसार भारताचे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यासाठी. 484 पानाचा मसुदा के. कस्तुरीरंगन या समितीने सर...

आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

         *आनंदी जीवनाची गुरुकिल्ली*  जीवन सुंदर आहे. जगणं सुंदर आहे .परंतु प्रत्येकाला आपले जीवन, आपलं जगणं हे आनंददायी करता आले पाहिजे. कारण जीवनामध्ये आनंद हा आपल्या मानण्यावर आहे .जर आपले मन समाधानी असेल ,आपले अंतःकरण समाधानी असेल तर आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. 1) आंतरिक परिवर्तन ,हृदय परिवर्तन करा. संत कबीर म्हणतात की मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर lमन के मत मत चलिये, पलक पलक मन और llआनंद हा आपल्या मनावर अवलंबून असतो असे म्हटले जाते की, आमच्या 40% आनंदाचा हिस्सा आमच्या मनावर अवलंबून असतो. आम्ही काय विचार करतो आमचे वर्तन कसे असते आम्ही कोणत्या क्रिया करतो यावर आमच्या जीवनातील 40% आनंदाचे प्रसंग अवलंबून असतात .50% आनंद हा आमच्या अनुवंशिक कारणामुळे आम्ही आनंदी राहू शकतो. केवळ दहा टक्के आमचा आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो की आम्ही येणाऱ्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. आमचा मेंदू त्याला कोणत्या प्रकारचे प्रतिक्रिया देतो यावर दहा टक्के आनंद अवलंबून असतो. म्हणून आमचा आनंद हा आमच्या सकारात्मक विचारावरच अवलंबून असतो असे म्हटले जाते . आमचा आ...