आनंदी जीवन (भाग 10)

 आनंदी जीवन हॅपी लाईफ 

जीवन सुंदर आहे जगणं सुंदर आहे. जीवन आनंदी आहे फक्त गरज आहे ती जीवनातील सुखाचे आनंदाचे प्रसंग ओळखून मिळणारा जीवनातील आनंद घेणे व आपले मिळालेले जीवन आनंदाने भरभरून जगणे. अध्यात्मानुसार असे सांगितले जाते की 84 लक्ष कोटी योनी झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मनुष्य जन्म मिळत असतो. प्रत्येक व्यक्तीला मिळालेला हा नरदेह अतिशय दुर्लभ आहे असे म्हटले जाते. त्यामुळे मिळणारा हा नरदेह अतिशय दुर्मिळ आहे त्यामुळे या शरीराचे महत्त्व प्रत्येकाने ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. करोडो रुपयांचा हा नरदेह मानवास जरी मिळालेला असला तरी अनेक लोक व्यसनाच्या आहारी जाऊन या शरीराचे नुकसान करत आहे. व्यसनाधीनता ही मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने निर्व्यसनी राहून मिळालेले जीवन आनंदाने जगणे अत्यंत आवश्यक आहे .अन्यथा अनेक रोगांचा बळी पडलेले आपले शरीर केवळ  व्यसनाधीनतेमुळे क्षतीग्रस्त झालेली आपणास दिसून येईल. त्यामुळे निरोगी शरीर राखणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे .आनंदी सुखी जीवन जगण्याची पंचसूत्री पुढीलप्रमाणे सांगता येते. 

1)मुलांना योग्य आहार ,संस्कार व शिस्त लावा. प्रत्येक पालकाने मुलांना योग्य आहार संस्कार व शिस्त लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जपान मधील अनेक लोक हे शंभर वर्षाच्या पुढे दीर्घायुषी जीवन जगत असलेले आपणास दिसून येतात .परंतु भारतामध्ये सरासरी व्यक्तीचे आयुर्मान हे 70 वर्ष झालेले आहे याचे कारण म्हणजे आमच्या जीवनातील काही होत असलेल्या चुका. भोजन करत असताना आम्ही भरपूर भोजन करतो . गरजेपेक्षा अधिकाधिक आम्ही भोजन करतो. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे त्यांना आपल्या भुकेपेक्षा ८० टक्के जेवण ते करतात याचा परिणाम ते दीर्घायुषी होत आहेत. तसेच जपानमध्ये मुलांच्या मनामध्ये देशप्रेम ,देशभक्ती यांचे संस्कार हे शालेय जीवनापासूनच दिले जातात .शालेय जीवनामध्येच मुलांना देशाविषयीचा अभिमान बाळगण्याचे शिक्षण दिले जाते .त्यासोबतच स्वयंशिस्त पाळण्याची गरज मुलांना सांगितली जाते .आज भारतामध्ये सिग्नल वर थांबण्याची कोणाचीही तयारी नसते. जर ट्राफिक वाला पोलीस नसेल तर अनेक जण सिग्नल तोडून चालत असलेले आपणास दिसून येतात .त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना योग्य आहार विहार संस्कार व शिस्त लावणे अत्यंत गरजेचे आहे. पिझ्झा ,बर्गर, चिप्स ,कुरकुरे यांच्या आहारी न जाता समतोल संतुलित आहार मुलाने घ्यावा असे संस्कार मुलावर करणे अत्यंत आवश्यक आहे. 

2) पालकांनी खर्च करत असताना गरज व शौक यातील फरक समजून घ्यावा .

अनेक पालके दुकानात गेल्यानंतर गरज नसताना अनेक गोष्टींची खरेदी करत असतात.  याचा परिणाम विनाकारण आपला पैशाचा अपव्य होत असतो .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने खर्च करत असताना गरज व शौक यातील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या वस्तूंची आपणास अत्यंत गरज आहे त्याच गोष्टीवर आपण आर्थिक खर्च केला पाहिजे. 

3) दुसऱ्याशी भांडण करण्यात वेळ व पैसा शक्ती खर्च करू नये.

अनेक जणांचा वेळ व शक्ती ही विनाकारण दुसऱ्याची भांडण करण्यात खर्च होत असते. प्रत्येक व्यक्ती हा बरोबरच असतो परंतु एकमेकांमध्ये निर्माण होणारे गैरसमज हे भांडणास कारणीभूत ठरत असतात. समजा समोर सहा हा अंक लिहिलेला आहे .समोरून पाहणारा सहा हा अंक तीन दिसत असतो तर पाठीमागून सहा अंक दिसत असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असते परंतु पाहणाऱ्याचा दृष्टिकोनामुळे गैरसमज निर्माण होत असतो तो गैरसमज वेळीच दूर करणे अत्यंत आवश्यक असतो. 

4) सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. 

प्रत्येकाने जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असते. सकारात्मक दृष्टिकोनामध्येच आपणास भविष्य दिसत असते आमच्या मनामध्ये जर नकारात्मक दृष्टिकोन असेल तर आम्हाला यश मिळणार नाही . जीवनामध्ये अनेक यशाची फलश्रुती ही केवळ सकारात्मक दृष्टिकोनातूनच होत असते.त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

5) आपले ध्येय सुस्पष्ट असावे. 

आनंदी जीवन जगण्यासाठी आपले ध्येय हे निश्चित व सुस्पष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे आपले ध्येय निश्चित सुस्पष्ट असल्याशिवाय आम्हास जीवनामध्ये आनंद प्राप्ती होणार नाही आमच्या मनामध्ये जर द्वंद्वपरिस्थिती असेल तर आम्हास योग्य दिशेने मार्गक्रमण करता येणार नाही त्यामुळे जीवनामध्ये आमचे ध्येय उद्दिष्ट स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे ज्याप्रमाणे अर्जुनाने द्रोणाचार्याने बाण मारण्यास सांगितल्यानंतर अर्जुनाच पक्षाचा केवळ डोळाच दिसत होता त्याला झाड दिसत नव्हते अन्यथा पक्षी दिसत नव्हता अगदी त्याचप्रमाणे आम्हास जीवनामध्ये आमचे ध्येय स्पष्ट दिसत असले पाहिजे तर आमचे यश नक्कीच आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना