Posts

 *नात्यात आनंद हवा* ........ 21व्या शतकामध्ये आधुनिकीकरणाच्या नावाखाली माणूस सतत धावपळत करत असलेला आपणास दिसून येते. आधुनिकीकरणाची प्रगतीमुळे माणसाची भौतिक प्रगती खूप मोठ्या स्वरूपामध्ये झालेले आहे परंतु या भौतिक प्रगतीच्या आभासी वास्तवामुळे माणसाचे सामाजिक संबंध मात्र दुरावलेले आपणास दिसून येत आहेत. आज नात्यांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी आज प्रयत्न करण्याची गरज आहे. आज प्रत्येक व्यक्तीचे नातेसंबंध बिघडलेले आपणास पाहावयास मिळत आहेत. नात्यातील भिन्नता वैमानस्य नव्हे तर ती एक जवळीकता साधण्याची संधी आहे. नात्यांमध्ये भिन्नत असू शकते अनेक वेळेस नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये दुरावा आलेले कटूता ही सामोपचाराने सहविचाराने आपण सोडवू शकतो यासाठी महत्त्वाची गरज असते की हे नाते जर आम्हाला अधिक मजबूत करायचे असेल तर आम्ही कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे  1) संवाद कौशल्य विकसित करावे ...यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यामध्ये संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे. नात्यामध्ये निर्माण झालेली कटूता आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही संवाद कौशल्याच्या म...

यशस्वी पालकत्व ... किशोरावस्थेतमूल समजून घेताना

 किशोरावस्थेत मूल समजून घेताना... किशोरावस्थेतील मुलांमध्ये विविध प्रकारचे शारीरिक व मानसिक विकासाचे बदल होत असतात. मुलांच्या किशोरावस्थेचा काळ हा त्याच्या आयुष्यातील संक्रमणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण काळ असतो. या कार्यकाळामध्ये प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या पाल्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. किशोर अवस्थेच्या काळामध्ये मुलांमध्ये विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक ,भावनिक , सामाजिक बदल होत असतात. त्यामुळे मुलांमध्ये होत असलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलाला अनुरूप प्रत्येक पालकाचे वर्तन असणे गरजेचे असते. अन्यथा  आपला पाल्य हा त्याच्यामध्ये होत असलेल्या शारीरिक बदलाविषयी अनभिज्ञ असतो व याचा फायदा समाजातील त्यांनी चुकीच्या अपप्रवृत्ती घेत असताना.त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत खुल्या मनाने चर्चा करणे गरजेचे असते .मातेने आपल्या मुलीशी विविध प्रकारच्या बदलाविषयी चर्चा करणे गरजेचे असते व पित्याने मुलाशी योग्य पद्धतीची चर्चा करणे गरजेचे असते की जेणेकरून त्यांच्यामध्ये होत असलेल्या शारीरिक मानसिक भावनिक बदलानुसार त्यांच्यामध्ये होत असलेले परिवर्तन यांची ओळख त्यांना...

सकारात्मक पालकत्व

 मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावे आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या नवनवीन प्रगतीमुळे मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये वापर वाढत असलेला आपणास पाहात आहे .कुटुंबातील छोट्या सदस्या पासून शाळेतील विद्यार्थी ,युवक ,महिला, वयस्कर मंडळी या सर्वांनाच मोबाईलने वेड लावून टाकल्यासारखे झाले आहे. प्रत्येकजण दिवसभरातील कमीत कमी तीन ते चार तास मोबाईलवर वेळ वाया घालवत आहे. मानवी जीवन अमूल्य आहे. मानवी जीवन सुंदर आहे. जगणं सुंदर आहे परंतु या सुंदर जगण्याला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे कुठेतरी विघ्न लागल्याचा प्रकार आपणास पहावयास मिळत आहे.शेजारी बसलेला माणूस एकमेकाशी बोलायला तयार नाही. सुसंवाद हरवत चाललेला आहे. एकमेकांशी सुसंवाद न जाता प्रत्येकजण मोबाईलच्या अतिरेकी वापरामध्ये असलेला आपणास दिसत आहे. आणि यामुळे खऱ्या अर्थाने शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचे नुकसान तर खूप मोठ्या प्रचंड स्वरूपामध्ये होत आहे. युवाशक्ती मोबाईल मुळे वाया जात आहे. भारत हा युवकांचा देश आहे 2047 पर्यंत भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे ...

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

 *आई-वडिलांची भूमिका*  यशस्वी पालकत्व या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर सुसंस्कार करण्यासाठी सकारात्मक विचारांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते. मुले हे देशाचे भविष्य असतात. भारताला 21 व्या शतकामध्ये आर्थिक महासत्ता करायचे असेल तर भारताचे भविष्य हे शाळा- शाळातून, घराघरातून, परिवार- परिवारातून घडत असलेले आपणास दिसत आहे. कोठारी आयोगाने सुद्धा सांगितले भारताचे भविष्य हे क्रीडांगणावर घडत आहे. खेळाकडून मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास होत असतो. मुले ही देशाचे भविष्य आहेत. मुले देशाची संपत्ती आहे. मुले ही कुटुंब ,देश, समाज, राष्ट्र या सर्वांचे कल्याण करण्यासाठी येणारी महत्त्वाची पिढी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले हे विश्वची माझे घर .हे विश्व जर आपल्याला एक घर म्हणून जर कुटुंबात, समाजात वावरायचे असेल तर येणारी ही पिढी ही सुसंस्कार संपन्न असणे अत्यंत गरजेचे आहे. आज विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप मोठी प्रगती होत आहे. परंतु या प्रगतीच्या फायद्यासोबतच याचे काही तोटे, नुकसान सुद्धा   आपणास पाहण्यास मिळत आहेत. वास्तवि...

आव्हाने स्वीकारा,

 आनंदी जीवन जगी सर्व सुखी असा कोण आहे lविचारी मना तूच शोधूनी पाहेl संत रामदास स्वामी. जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख असते. परंतु प्रत्येक माणसाला जीवनामध्ये मात्र सुखाचे अपेक्षा असते दुःख जीवनात कोणालाही नको असते. परंतु मानवी जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांच्या धाग्याने विणलेला मानवी रुमाल आहे असे म्हटले जाते. सुख म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा यांच्यानुसार जीवनामध्ये जीवन जगणे परंतु याच अपेक्षांच्या विरुद्ध जीवनात जीवन जगावे लागले तर माणसाला दुःख झाले असे वाटते. परंतु मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असते. अनेक महापुरुष साधुसंत यांना सुद्धा जीवनामध्ये संकटांचा दुःखाचा सामना करावा लागला. प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षे वनवासात जावे लागले भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोठडीमध्ये झाला संत ज्ञानेश्वरांना लोकांनी त्रास दिला सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर लोकांनी चिखल शेणाचा मारा केला संत तुकारामांच्या गाथा याच दुष्ट लोकांनी इंद्रायणी मध्ये बुडवल्या. अशाप्रकारे अनेक संत ,महापुरुष ,जीवात्मा यांना प्रत्येकाला दुःखाचा सामना करावा लागत असतो. परंतु मिळालेले दुःख हे दुःख न मानता त्य...

आनंदी जीवन

 आनंदी जीवन जगी सर्व सुखी असा कोण आहे lविचारी मना तूच शोधूनी पाहेl संत रामदास स्वामी. जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख असते. परंतु प्रत्येक माणसाला जीवनामध्ये मात्र सुखाचे अपेक्षा असते दुःख जीवनात कोणालाही नको असते. परंतु मानवी जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांच्या धाग्याने विणलेला मानवी रुमाल आहे असे म्हटले जाते. सुख म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा यांच्यानुसार जीवनामध्ये जीवन जगणे परंतु याच अपेक्षांच्या विरुद्ध जीवनात जीवन जगावे लागले तर माणसाला दुःख झाले असे वाटते. परंतु मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असते. अनेक महापुरुष साधुसंत यांना सुद्धा जीवनामध्ये संकटांचा दुःखाचा सामना करावा लागला. प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षे वनवासात जावे लागले भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोठडीमध्ये झाला संत ज्ञानेश्वरांना लोकांनी त्रास दिला सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर लोकांनी चिखल शेणाचा मारा केला संत तुकारामांच्या गाथा याच दुष्ट लोकांनी इंद्रायणी मध्ये बुडवल्या. अशाप्रकारे अनेक संत ,महापुरुष ,जीवात्मा यांना प्रत्येकाला दुःखाचा सामना करावा लागत असतो. परंतु मिळालेले दुःख हे दुःख न मानता त्य...

मूल समजून घेताना

 *मूल समजून घेताना....* मुलांना चांगले घडवणे चांगले सुसंस्कार करणे,जबाबदार नागरिक तयार करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने सकारात्मक पालकत्व ही जबाबदारी पार पाडत असताना मुलांच्या शारीरिक, मानसिक, भौतिक आध्यात्मिक विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मुलांशी प्रत्येक पालकाचे वर्तन असणे अपेक्षित असते.त्यामुळे प्रत्येकाने मुलाकडून अपेक्षित वर्तन बदल घडवून येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. वास्तविक पाहता सकारात्मक पालकत्व ही एक कसोटी असते. पालकत्व ही एक जबाबदारी आहे आणि त्यामुळे प्रत्येक पालकांनी जबाबदारीने आपल्या मुलाशी वर्तन करणे अत्यंत गरजेचे असते. पाल्य  सुसंस्कार संपन्न करण्यासाठी प्रत्येक पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते यासाठी शिक्षक पालक व समाज या त्रिवेणी संगमातून देशाचा जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी प्रत्येक घटकावर येऊन पडलेली असते. त्यामुळे सकारात्मक पालकत्व  एक आव्हान आहे परंतु हे आव्हान सहजपणे पार करण्यासाठी प्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे व आपल्या पाल्याच्या विकासासाठी स्वतःमध्ये देखील काही अनुरूप बदल घडू...