*नात्यात आनंद हवा* ........

21व्या शतकामध्ये आधुनिकीकरणाच्या नावाखाली माणूस सतत धावपळत करत असलेला आपणास दिसून येते. आधुनिकीकरणाची प्रगतीमुळे माणसाची भौतिक प्रगती खूप मोठ्या स्वरूपामध्ये झालेले आहे परंतु या भौतिक प्रगतीच्या आभासी वास्तवामुळे माणसाचे सामाजिक संबंध मात्र दुरावलेले आपणास दिसून येत आहेत. आज नात्यांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी आज प्रयत्न करण्याची गरज आहे. आज प्रत्येक व्यक्तीचे नातेसंबंध बिघडलेले आपणास पाहावयास मिळत आहेत. नात्यातील भिन्नता वैमानस्य नव्हे तर ती एक जवळीकता साधण्याची संधी आहे. नात्यांमध्ये भिन्नत असू शकते अनेक वेळेस नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये दुरावा आलेले कटूता ही सामोपचाराने सहविचाराने आपण सोडवू शकतो यासाठी महत्त्वाची गरज असते की हे नाते जर आम्हाला अधिक मजबूत करायचे असेल तर आम्ही कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे 

1) संवाद कौशल्य विकसित करावे ...यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यामध्ये संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे. नात्यामध्ये निर्माण झालेली कटूता आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही संवाद कौशल्याच्या माध्यमातून ही कटूता दूर करू शकतो. कारण संवाद कौशल्य हे नात्यातील आलेली कटूता दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण शस्त्र आहे असे आपणास म्हणता येते. समाजामध्ये चर्चेच्या माध्यमातून अनेक मार्ग निघू शकतात त्या मार्गाच्या माध्यमातून आलेली कटूता आपण दूर करू शकतो. कुठलीही समस्या ही फक्त एकमेकाविषयी असलेले समज, गैरसमज यांच्या माध्यमातून निर्माण झालेले असते आणि त्यामुळे जर आमच्याकडे संवाद कौशल्य असेल आम्ही एकमेकाशी सतत चर्चा करत असो तर चर्चेच्या माध्यमातून आलेली कटूता ही नक्कीच दूर होऊ शकत असते. परंतु जर आम्ही चर्चेची दरवाजे बंद केली , संवादाचे दरवाजेच आम्ही बंद केले असतील तर आलेली कटूता ही कधीच दूर होणार नाही. यासाठी आज नात्यांमधील भिन्नता ही आम्हाला दूर करायचे असेल तर आम्हाला संवाद कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे आणि यासाठी आम्ही चर्चा,  समुपदेशन माध्यमातून हा ही भावना आम्ही व्यक्त करू शकतो. 

2) संवेदनाशीलता जपावी.... आज नात्यांमध्ये जे कटूता आलेली आहे पती-पत्नी ,बहिण भाऊ, आई वडील, नातेसंबंध या सर्व नात्यांमध्ये आलेली कटूता आम्हाला दूर करण्यासाठी संवेदनशीलता जपणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्याच्या भावनेचा, मनाचा जर विचार केला आणि संवेदनशीलता जर आम्ही जपण्याचा प्रयत्न केला तरी नात्यातील कटूता नक्कीच दूर होण्यास मदत आहे. त्याला काय वाटेल? मीच का बोलू? त्यानेच प्रथम बोलावे? त्याचे काम नाही का? दरवेळेस मीच पुढाकार का घ्यावा? या बाबीचा विचार न करता आपण आपले पहिले पाऊल पुढे टाकने गरजेचे असते.जर आम्ही हा विचार केला तर नक्कीच आमच्या हातून दुसऱ्याचे मन दुखावले जाणार नाही व दुसऱ्याच्या मनामध्ये तिरस्कार , क्रोध, राग ,तिरस्कार, असुया ,कडवटपणाची भावना देखील निर्माण होणार नाही आणि म्हणून यासाठी एकमेकांविषयीची संवेदनशीलतेची भावना जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत .मी जर असे वागलो तर त्याला काय वाटेल ?हा जर विचार प्रत्येकाने केला आणि जर तो जर माझ्याशी वागत असेल तर मी त्याच्याशी समोपचारने कसे वागावे? या गोष्टीचा जर आम्ही नक्की विचार केला आणि   संवेदनशीलता, एकमेकांचे मन जपण्याचा प्रयत्न केला. तर नात्यांमध्ये आनंद निर्माण होऊ शकतो प्रेम निर्माण होऊ शकते. आपण नेहमी एकमेकाचे मन जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकाविषयी प्रेमाचे भावना मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कोणाचेही मन माझ्यामुळे दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर नक्कीच आम्ही या नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो.एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. मोठ्या भावाचे लग्न झालेले होते. त्याला दोन मुले होती .लहान भावाचे नुकतेच लग्न झालेले होते. परंतु ते दोघेही वेगळे राहिलेले होते. दोघेही व्यवस्थित पद्धतीने शेती करत होते. दोघांचाही सुखी संसार चाललेला होता. एकदा दोघांची शेतीची पिके एकदाच कापून झाले, खळे झाले. शेतामध्ये धान्याच्या राशी लागलेल्या होत्या.

 परंतु दोघांचेही मन मात्र एकमेकांच्या अडीअडचणी ,संकटे , समस्या यांच्या भोवतीच गुंतलेले होते.थोरल्या भावाला वाटले, मी खूप मोठ्या स्वरूपात कष्ट केलेले असल्यामुळे माझे चांगले उत्पन्न झालेले आहे .परंतु लहान भाऊ आहे तो त्याचे उत्पन्न कमी झालेले असेल त्याला अडचण असेल असेल म्हणून मी त्याच्या मदतीसाठी एक  गव्हाचा कट्टा त्याच्या शेतामध्ये नेऊन टाकतो. म्हणून तो आपल्या शेतात तयार झालेल्या एक गव्हाचा कट्टा उचलून  रात्री निघाला. त्याच दिवशी लहान भावाला वाटले की, मोठ्या भावाचे लग्न झालेले आहे.त्याचे दोन मुले आहेत. आम्ही दोघेच नवरा बायको आहोत. माझ्या मोठ्या भावाच्या घरी चार व्यक्ती आहेत त्यांना जास्त अन्नधान्य लागते त्यांना अडचण असेल समस्या असेल संकट असेल, हा विचार करून म्हणून माझ्या मोठ्या भावाला अडचण असेल म्हणून  त्याला असे वाटले की मी त्याला काहीतरी मदत करावी. या भावनेने त्याने स्वतःच्या शेतातील गव्हाचा एक कट्टा उचलला स्वतःच्या शेतातील कट्टा घेऊन मोठ्या भावाच्या शेतात नेऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. अमावस्येची अंधारी रात्र होती दोघे भाऊ एकमेकाला मदतीच्या भावनेने आपल्या शेतातील गव्हाचा कट्टा घेऊन निघाले होते. योगायोगाने दोघांचीही एकमेकाला अंधारामध्ये धडक बसते. लहान भाऊ मोठ्याने म्हणतो,अरे दादा तू? मोठा भाऊ म्हणतो अरे भैया तू ?आणि मग दोघांच्याही लक्षात आले की दोघेजण दुसऱ्याला मदतीसाठी तत्पर होते हीच संवेदनशीलता, हीच भावना, हीच तत्परता आम्हाला आमच्या जीवनामध्ये जपायचे असेल आणि आज भावामध्ये असलेले नात्यांमध्ये दुरावा हा केवळ  संवेदनशीलता जपल्यामुळे दूर होऊ शकतो. 

3. आदर आणि ऐकण्याची कला निर्माण झाल्यामुळे नातेसंबंध जपता येतात. कुठलेही नाते कोणतेही नाते जर आम्हाला अधिक मजबूत करायचे असेल कारण नातेही मोठ्या प्रसंगामुळे सुंदर बनत नाही तर आम्हाला त्यासाठी एकमेकाविषयीचा आदर आणि एकमेकाविषयीचे ऐकण्याची कला आम्हाला आत्मसात करणे हे गरजेचे आहे. नात्यामध्ये आम्हाला जर आमचे नातेसंबंध विकसित करायचे असतील तर एकमेकाविषयी आदरभाव  आम्हाला जोपासणे अत्यंत गरजेचे असते आणि हा आदरभाव जोपासण्याची कला आम्हाला कुटुंबापासून विकसित करावी लागते. कारण आम्ही जर आमच्या नात्यांमध्ये समन्वय सुसंवाद साधला, तशाच पद्धतीचे सुसंस्कार आमच्या मुलावर केले जातात व ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये त्यांच्या नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने जबाबदाऱ्याने सांभाळण्याचा ते प्रयत्न करत असतात .त्यामुळे कुटुंबातील आम्हाला सर्वांना एकमेकांविषयीचा आदर आणि ऐकण्याची कला या दोन गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. कारण जर आम्ही जर एकमेकांचा आदर करत असू तर नक्कीच आमची मुले सुद्धा त्यांच्यावर अशाच पद्धतीचे सुसंस्कार केले जातील व ते सुद्धा एकमेकाचा आदर करत असतील व जर त्यांनी एकमेकाचा सादर केला त्यासोबतच त्यांनी जर एकमेकांशी ऐकण्याची कला निर्माण केली तर नातेसंबंध अधिक सुदृढ केले जाऊ शकतात. त्याचे म्हणणे काय आहे ?तो नाराज का आहे ?त्याला काय वाटते ?या भावनेचा जरा मी विचार केला तर नक्कीच आमच्या जीवनामध्ये मतभेद म्हणजे ही शेवट नाही तर ही संवादाची सुरुवात असते अशा पद्धतीची भावना आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. मग हे नाते पती-पत्नीचे असू द्या ,  बाप आणि मुलगा ,आई आणि वडील यांच्यामध्ये असू द्या किंवा सासु सुनेचे असू द्या या सर्व नात्यांमध्ये या गोष्टींचा या भावनेचा विचार करणे आम्हाला गरजेचे असते. कारण सुसंवादाची सर्वात मोठी पायरी म्हणजे ऐकण्याची क्षमता असते. समोरच्या व्यक्तीला पूर्ण लक्ष देऊन  पूर्वग्रहांना न ठेवता ऐकणे हा सुसंवादाचा पहिला टप्पा असतो कारण प्रत्येक व्यक्तीचे सर्वात मोठी महत्त्वाची गरज असते की मला समजलं गेलं पाहिजे .यासाठी मी भाषाविरुद्ध तू भाषा, वादाची सुरुवात होते .तू नेहमी असेच करतो ?तू कधीच मला समजून घेत नाही? ती भाषा समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानावर आघात करते आणि प्रतिकार वाढवते. त्याऐवजी मला असं वाटतं की या परिस्थितीत मला वाईट वाटतं अशी भाषा वापरल्यामुळे संवाद शांत वातावरणात पुढे जातो .योग्य वेळ आणि जागेची निवड आणि त्यामुळे भावनांचा तापलेला क्षण हा महत्त्वाचा चर्चेसाठी एक घन असतो तर आम्ही शांतपणे एकमेकांशी आदर ठेवून ऐकण्याची कला विकसित केली तर नक्कीच यातून मार्ग काढू शकतो .कारण आज प्रत्येकावर कामाचा खूप ताण तणाव आहे आणि अशावेळी कुठल्याही विषयावर चर्चा करत असताना शांत वातावरणामध्ये आपण चर्चा करणे गरजेचे असते. पती-पत्नीने सुद्धा वादग्रस्त विषयावर चर्चा करण्यापेक्षा त्यावेळेस दोघेजण शांत असेल त्यावेळेस त्या विषयातून चर्चेतून मार्ग निघतो कारण अशा परिस्थितीत आमची आमचे मानसिक स्थिती संवादासाठी योग्य असली पाहिजे .अन्यथा थकवा ताण तणाव असेल तर चर्चा योग्य पद्धतीने केली जाऊ शकत नाही सुसंवाद साधला जाऊ शकत नाही. त्यासाठी समाजाला सुरक्षित शांत आणि आदरपूर्वक वातावरण गरजेचे असल्याने आदरपूर्वक वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते.


4. नाते जिंकायला पाहिजे की वाद? नात्यांमध्ये आलेली कटूता दूर करण्यासाठी नातेसंबंधांमध्ये आलेली मतभेद दूर करण्यासाठी आम्हाला नातेसंबंध जपण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. वाद क्षणीक असतो परंतु नातेसंबंध आयुष्यभरासाठी असतात. आयुष्यभरासाठी किंवा त्याचे प्रेमाचे आपुलकीचे स्नेहाचे बंध असतात. त्यामुळे आमच्या मनामध्ये एका वेगळ्या विषयाकडे असेल तर तो दूर करण्यासाठी आम्हाला नातं जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण वाद अडचणीत असतो तो मिटला जाऊ शकतो आणि म्हणून वाद जिंकण्याच्या नादात नातं हरवून जाऊ शकते.कोण बरोबर आहे ? कोण महत्त्वाचा आहे? हे तपासण्यापेक्षा आपण त्या दोघांच्या चर्चेच्या माध्यमातून समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जर दोघे एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा समस्ये विरुद्ध लढणे गरजेचे असते.

5. तडजोड म्हणजे माघार नाही. नातेसंबंध टिकवण्यासाठी आम्हाला अनेक वेळेस नात्यांमध्ये तडजोड करण्याचे अत्यंत आवश्यकता असल्याने तडजोड म्हणजे केवळ माघार नसते तर तो तडजोड म्हणजे पुढे टाकण्यासाठी एक पाऊल फक्त मागे घेतलेले असते. असे म्हटले जाते की आमच्या मनामध्ये सहनशीलता असली पाहिजे , संयम असला पाहिजे दुसऱ्याचा आदर करण्याचे भावना असली पाहिजे आणि हे जेव्हा असेल तेव्हाच आमच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊ शकत असते. कुठल्याही समस्येतून मार्ग काढण्यासाठी आम्हाला तडजोड करण्याची तयारी ठेवावी लागते आणि हे तडजोड करण्याची तयारी ठेवणे म्हणजेच आम्हाला माघार घ्यावी लागते. चार पावले लांब उडी मारण्यासाठी दोन पावले मागे सरकावे लागते हीच महत्त्वाची भावना असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माघार घेणे म्हणजे झुकणं  नाही तर नात्यातील एक परिपक्वता निर्माण करण्याची गरज असते. दोघांचे हात पुढे येऊ देणे म्हणजे क्षमा आणि विस्मरण जपण्याचा मार्ग असतो .प्रत्येक नात्यावरून चुका होत असतात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत बसलो तर संवाद थांबत असतो. मन मोकळे करायला लागणे महत्त्वाचे असते.चला पुन्हा सुरुवात करू या असंआपण म्हटलं पाहिजे आणि त्यासाठी नात्यांमध्ये आपण क्षमा आणि विस्मरणीय दोन गोष्टी आपण महत्त्वाच्या आहेत .चला तर एकमेकांना क्षमा करूया आणि आलेले जीवनातील वाईट अनुभव त्यांचं विस्मरण करूया .कारण क्षमा आणि विस्मरण हे नात्याची अतूट जोड असते. 

6. नात्याचे सौंदर्य एकमेकाला समजून घेण्यात असते. नात्याचे सौंदर्य हे एकमेकांवर कुरघोडे करण्यात नसते एकमेकाचे उनिवा शोधण्यात नसते.खऱ्या अर्थाने नात्याचे सौंदर्य हे एकमेकांना समजून घेण्यामध्ये असते .कारण नात्याचा खरं सौंदर्य हे एकमेकांना बदलण्यामध्ये नाही तरी समजून घेणे महत्त्वाचे असतात .आम्हाला नाते टिकवण्यासाठी त्यामध्ये एकत्र उपाय शोधण्याची गरज असते कारण एकत्र उपायाच्या माध्यमातूनच आमचे ते नाते टिकले जाऊ शकते त्या समस्येवर तडजोडनिर्माण होऊ शकते. एखाद्या ठिकाणी तीन हा अंक लिहिलेला आहे  समोरून बघितले तर त्याला तीन दिसते आणि पाठीमागच्या बाजूला बघितली तर त्याला सहा दिसते आमच्यामध्ये निर्माण झालेले समस्या आमच्यामध्ये निर्माण झालेल्या विसंवाद हा त्याच गोष्टीचे प्रतीक असतो की एकाच गोष्टीकडे आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो .मला वाटते माझेच खरे.त्याला वाटते त्याचेच खरे .माझे खरे की त्याचे खरे ?ज्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा त्यातून आपण योग्य पद्धतीने मार्ग काढणे अत्यंत गरजेचे असते.  परंतु जे सत्य आहे ते मात्र स्वीकारावे लागते आणि यासाठी आपल्याला नातेसंबंध टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते .मतभेद नैसर्गिक असून ते अनेक न बोलले यापेक्षा अपूर्ण संवाद ,भावनिक थकवा ,असुरक्षिता आणि व्यक्तिमत्त्वातील फरकावर आधारित असतात .त्यांना आपल्या मनामध्ये असलेल्या भावना दाबून ठेवण्यात असल्याचा शांत सन्मानपूर्वक समाजाच्या माध्यमातून आम्ही मतभेदाच्या नात्यावर मार्ग काढू शकतो .कारण मतभेद च्या नात्यावर आघात करण्यापेक्षा जवळीकता निर्माण करण्याची संधी आम्हाला त्यातून निर्माण होत असते .नात्यांमध्ये एकता टिकवण्यासाठी आज कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी नात्यांमध्ये सुसंवाद साधण्यास गरजेचे आहे. अमेरिकेसारखे आज विभक्त कुटुंब पद्धती भारतामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पहावयास मिळत आहे ही आमच्या देशाच्या संस्कृतीसाठी अतिशय घातक स्वरूपाची संस्कृती आहे असे आम्हास पाहाव्यास मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आमचे नातेसंबंध सुदृढ,मजबूत, सुरक्षित ठेवायचे असेल तर आम्हाला रामायणपासून जे आम्हाला त्यागाची संस्कृती मिळालेली आहे ती आम्हाला स्वीकारण्याची गरज आहे परंतु आज आधुनिकीकरणाचे नावाखाली भोगवादी, चंगळवादी संस्कृती मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे .रामायणामध्ये भरताने स्वतः मिळालेल्या राज्याचा त्याग प्रभू श्रीरामचंद्रजीसाठी केला तर श्रीरामचंद्रजींनी मिळालेले स्वतःचे राज्य हे भरतासाठी त्यागाच्या माध्यमातून देऊन टाकले तर अशा पद्धतीने त्यागाची संस्कृती,  मूल्येआम्हाला शालेय स्तरापासून मुलांच्या मनामध्ये निर्माण करावी लागणार आहेत. त्यागाची मूल्ये रुजवण्याची आवश्यकता आहे.देशातील युवकांमध्ये अशा पद्धतीची भावना जर खऱ्या अर्थाने निर्माण झाली तर समाजामध्ये होत असलेला विसंवाद ,  नात्यांमध्ये असलेला दुरावा हा नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या जुन्या संस्कृतीचा आधार घेण्याची आज काळाची गरज आहे.रामायण हे आम्हाला  करायला शिकवते तर महाभारतातून आम्हाला भोगवादी संस्कृती दिसून येते त्यामुळे आम्हाला रामायणाचा जीवनामध्ये आधार घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर महाभारताच्या माध्यमातूनआम्हाला भोगवादी संस्कृतीमुळे विनाशाकडे, पतनाकडे कशा पद्धतीची वाटचाल होते ?अशा पद्धतीचा विचार आमच्या मुलांमध्ये युवकांमध्ये या देशातील कुटुंबातील प्रत्येक घराघरांमध्ये मनामनामध्ये आम्हाला रुजवण्याची गरज आहे .तरच खऱ्या अर्थाने भारताचे 21 व्या शतकामध्ये होणारे महासत्ता स्वप्न पूर्ण होणार आहे .आम्हाला देशाचा भौतिक विकास साधायचा नाही तर आम्हाला मनामनामध्ये देशाविषयीचे देशप्रेम , राष्ट्रीय एकात्मता ,सर्वधर्म समभाव या मूल्यांचे विचार रुजवायचे आहेत.यासाठी आम्हाला त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे .जोपर्यंत आम्ही त्याची सुरुवात स्वतःपासून करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास होणार नाही. वरील दिलेले सर्व उपाय आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने अंगीकार करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच नात्यांमध्ये असलेली कलह या गोष्टी दूर होऊन आमच्या मनामध्ये एकसंघतेची भावना निर्माण होईल आणि हीच भावना आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेकडे घेऊन जाण्यास मदत करणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर आम्हाला सांगितले की विश्वचे माझे घर त्यांनी तर संपूर्ण विश्वालाच माझे घर म्हटलेले आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्वाचा संदेश आम्हाला जगामध्ये द्यायचा असेल तर आम्हाला स्वतःला नात्यांमध्ये आमचे संबंध टिकविण्याची आज काळाची गरज आहे आणि नक्कीच आम्ही यामध्ये असे संबंध टिकविण्यामध्ये यशस्वी झालो तर आमचा देश जगामध्ये दीपस्तंभ म्हणून इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल याच शंका नाही.

लेखक श्री गोपीचंद बर्डे लातूर

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना