सकारात्मक पालकत्व

 मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावे

आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या नवनवीन प्रगतीमुळे मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये वापर वाढत असलेला आपणास पाहात आहे .कुटुंबातील छोट्या सदस्या पासून शाळेतील विद्यार्थी ,युवक ,महिला, वयस्कर मंडळी या सर्वांनाच मोबाईलने वेड लावून टाकल्यासारखे झाले आहे. प्रत्येकजण दिवसभरातील कमीत कमी तीन ते चार तास मोबाईलवर वेळ वाया घालवत आहे. मानवी जीवन अमूल्य आहे. मानवी जीवन सुंदर आहे. जगणं सुंदर आहे परंतु या सुंदर जगण्याला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे कुठेतरी विघ्न लागल्याचा प्रकार आपणास पहावयास मिळत आहे.शेजारी बसलेला माणूस एकमेकाशी बोलायला तयार नाही. सुसंवाद हरवत चाललेला आहे. एकमेकांशी सुसंवाद न जाता प्रत्येकजण मोबाईलच्या अतिरेकी वापरामध्ये असलेला आपणास दिसत आहे. आणि यामुळे खऱ्या अर्थाने शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचे नुकसान तर खूप मोठ्या प्रचंड स्वरूपामध्ये होत आहे. युवाशक्ती मोबाईल मुळे वाया जात आहे. भारत हा युवकांचा देश आहे 2047 पर्यंत भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे 2047 पर्यंत माझा भारत आर्थिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे स्वप्न होते. परंतु आर्थिक महासत्ता जर भारताला निर्माण करायचे असेल तर देशाची युवाशक्ती, शालेय जीवनातील विद्यार्थी यांच्यावर खऱ्या अर्थाने सुसंस्कार करणे ही काळाची गरज बनलेली आपणास पाहावयास मिळत आहे.आज प्रत्येक जण मोबाईलच्या आहारी गेलेला आहे .मोबाईलचा अतिरेकी वापर वाढलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोबाईल मुळे जीवनातील आनंद हरवत चाललेला आहे. मोबाईलचे अनेक दुष्परिणाम आहे त्यापैकी घटस्फोटाचे वाढत असलेले प्रमाण हे देखील एक कारण बनत चालले आहे. घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड स्वरूपात वाढवण्याचे प्रमुख कारण म्हणजे मोबाईल आहे. प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड आहे. कशासाठी हवा मोबाईल ला पासवर्ड ?जर तुमचे जीवन वाहणाऱ्या झऱ्यासारखे, त्या पाण्यासारखे स्वच्छ असेल तर मोबाईलला पासवर्ड टाकण्याची गरज नाही. परंतु आज प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड ठेवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे.  मोबाईल मध्ये काय चालले आहे?  मुले काय पाहत आहेत? ही पालकाला कळत नाही आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे मुलांच्या मनावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार केले जात नाहीत.कालच एका खाजगी कोचिंग क्लासेसच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी दुसऱ्या त्याच्या मित्राची किरकोळ भांडणामुळे गळा चिरून हत्या केली. काय भयंकर हे दृश्य? कुठून शिकतात ही मुले? हा सर्व मोबाईलचा परिणाम आहे की काय? हा सर्व कमी संस्कार झाल्याचा परिणाम आहे की काय? असे वाटायला लागले आहे.मोबाईल हा चांगला तितका काय तितकाचा वाईट आहे.  असं म्हटलं जातं की अग्नी चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. अग्नी शिजवतो तेव्हा तो चांगला आहे परंतु आग लागते त्यावेळेस अग्नी वाईट आहे.अगदी त्याच प्रकारे मोबाईलचा वापर आम्ही कसा करतो? हे पाहणे तितकेच गरजेचे आहे आणि यासाठी समाजातील पालकवर्ग, शिक्षकवर्ग ,समाजातील जाणकार मंडळी ,विचारवंत, शिक्षणतज्ञ या सर्वांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची आज गरज बनलेली आहे. कारण मोबाईलचा हा भस्मासुर कधीकाळी मुलांचे कोवळे कोमल जीवन उध्वस्त करेल हे सांगता येत नाही. आज समाजामध्ये घटस्फोटाचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहे यासाठी मोबाईल हा अत्यंत कारणीभूत आहे या मोबाईल मुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होते की काय? अशा प्रकारची समाजाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यासाठी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे काळाची गरज आहे. सकारात्मक पालकत या गोष्टीवर विचार करत असताना प्रत्येक पालकाने या गोष्टीची जबाबदारीचे भान ठेवण्याचीअत्यंत गरज आहे. पालकत्व एक जबाबदारी आहे. आम्ही ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आम्हाला पाल्यावर जाणीवपूर्वक सुसंस्कार करावे लागतात. जाणवपूर्वक त्याला योग्य पद्धतीचे वर्तनात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु आज पालक या गोष्टी गांभीर्याकडे पाहत नाही. प्रत्येक पालक पैसा कमविण्याच्या जीवनशैलीत कुठेतरी मुलावर सुसंस्कार करण्याच्या कामांमध्ये कमी पडत आहे की काय? अशा पद्धतीची जाणीव निर्माण होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करण्यासाठी प्रत्येक पालकांनी मोबाईलचा अतिरेकी स्वतः कमी वापर टाळणे व मुलावर कशा पद्धतीचे सुसंस्कार करता येतील याचा विचार करणे ही काळजी गरज आहे. यासाठी समाजातील सर्वच जाणकार मंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखादा पाल्य जर एखाद्या पालकाकडे मोबाईलसाठी आग्रह करू लागला तर त्या पालकांनी त्या पाल्यास  पुढील प्रश्नविचारणे गरजेचे आहे. 

*मोबाईल सुरू करण्यापूर्वी प्रश्न विचारावे* 

1)मोबाईल कोणत्या कारणासाठी घेत आहे ?2)किती वेळेसाठी घेत आहे ?

3) तो मोबाईल मध्ये काय पाहणार आहे ? 4)खरच मुलाला मोबाईलची गरज  आहे का?

5) मुलाला नंतर मोबाईल दिला तर चालेल का? 

 6)मोबाईल नाही दिला तर तर चालेल का ?

7)मी जास्त मोबाईल वापरत नाही ना?

अशा पद्धतीचे प्रश्न प्रत्येक पालकांनी आपल्या मुलास विचारणे गरजेचे आहे. यातून मुलाला सुद्धा आत्मनिरीक्षण करता येईल आत्मपरीक्षण करता येईल. खरोखरच मुलगा अभ्यासासाठी मोबाईल वापरत असेल तर तात्पुरत्या स्वरूपात त्याला मोबाईल देण्यात काही अडचण नाही परंतु अभ्यासाच्या नावाखाली जर मुलगा मोबाईल मध्ये विविध स्वरूपाचे व्हिडिओ गेम जर खेळत असेल आणि त्यामुळे मुलाचे मानसिक संतुलन, मानसिक स्थिती बिघडत असेल आणि तो अभ्यासापासून परावर्त होत असेल तर यासाठी प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक विचार करणे काळाची गरज आहे .एखाद्या मुलास मोबाईल देत असताना प्रत्येक पालकांनी काही नियम, दंड आणि बक्षीस यासाठी नियम बनविणे गरजेचे आहे .एखाद्या मुलाने योग्य पद्धतीने मोबाईल वापरला तर त्यासाठी आपणास बक्षीस देणे सुद्धा गरजेचे असते .परंतु जर त्याने चुकीच्या पद्धतीने मोबाईलचा वापर केला तर त्यासाठी कठोर शिक्षा करणे ,दंड करणे जेणेकरून मुलाच्या हातून चुका होणार नाही त्यासाठी काळजी घेणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य ठरते .नियम पाळले तर बक्षीस ,नियम मोडले सर दंड अशा पद्धतीची भावना प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या मनामध्ये रुजविणे गरजेचे असते.  बक्षीस म्हणजे आवडीचा पदार्थ खायला मिळेल, गिफ्ट मिळेल. दंड म्हणजे मुलाला शिक्षा करण्यासाठी वेगवेगळे स्वरूपाची कामे करावी लागणार असे त्याला समजावून सांगणे. प्रत्येक पालकांनी मुलांच्या मोबाईलवापरा संदर्भात काही नियम बनविणे गरजेचे असते. अभ्यास झाल्याशिवाय मोबाईल नाही . प्रत्येक पालकांनी मुलाला मोबाईल वापरण्यासंदर्भात देत असताना अभ्यास झाल्याशिवाय मी तुला मोबाईल देणार नाही. तू प्रथम अभ्यास कर व त्यानंतर काही वेळ माझ्यासमोर तू मोबाईल वापर अशा पद्धतीचे नियम बनविणे गरजेचे आहे

कोणत्या ॲप वापरता? कोणते व्हिडिओ पाहता? किती वेळ लागणार ?मुलासाठी मोबाईल वापरण्यासाठी काही ठराविक वेळा ठरविण्याची प्रत्येक पालकांची महत्त्वपूर्ण सवय असणे गरजेचे आहे.प्रत्येक पालकांनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे असते तर या गोष्टी सुनिश्चित करणे गरजेचे असते की कोणत्या वेळेस आपण आपल्या पाल्यास मोबाईल द्यायचा नाही . ठराविक वेळा ठरवा. नो फोन नोझोन यामध्ये जेवण करताना मोबाईल नाही ज्यावेळेस मुले भोजन करत असतात त्यावेळेस भोजन करताना मोबाईल देणे चुकीचे आहे. हे मुलांना नियम ठरवून देणे गरजेचे आहे की अभ्यास करताना मोबाईल नाही. मुलगा ज्या वेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस अभ्यास करत असताना प्रत्येक पालकांनी या गोष्टीचा नियम निश्चित केला पाहिजे की अभ्यास करत असताना मोबाईल वापरणे चुकीचे आहे व हे मुलांना पटवून देणे सुद्धा तेवढेच गरजेचे असते. कुटुंबासोबत गप्पा मारत असताना मोबाईल नाही. मुलासाठी मनोरंजनाचे पर्याय शोधा .मुलांचे मनोरंजन करण्यासाठी योग्य पद्धतीचे पर्याय शोधणे गरजेचे असते. केवळ मोबाईल हेच मनोरंजनाचे  साधन नाही तर विविध पर्यायांच्या माध्यमातून आपण मुलांचे मनोरंजन करू शकतो. जेणेकरून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक ,अध्यात्मिक विकास साध्य केला जाऊ शकतो याचा पालकांनी विचार करणे गरजेचे असते. पुस्तक वाचायला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की वाचन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. वाचाल तर वाचाल ही त्यांची शिकवण आम्ही आमच्या जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे. राजर्षी शाहू महाराज म्हणत असत की शिक्षणाशिवाय उन्नती नाही.  म्हणून वाचनाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुलांना पुस्तके वाचायला देणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक विविध पद्धतीचे छोटे छोटे पुस्तके ,विचारवंतांची पुस्तके महापुरुषांची पुस्तके आपल्या मुलास वाचण्यासाठी देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यातून मुलांमध्ये योग्य पद्धतीचे इष्ट परिवर्तन, वर्तनात परिवर्तन होऊ शकते कारण मुलांचे वर्तन परिवर्तन घडविणे हेच शिक्षणाचे ध्येय आहे. मुलांचा मोबाईलचा अतिरेकी वापर करण्यासाठी प्रत्येक पालकांनी मुलासोबत चालायला जावा. कुटुंबासोबत गप्पा मारत बसा. मुलासोबत खेळ खेळा. प्रत्येक पालकांनी मुलासोबत वेगवेगळे स्वरूपाचे छोटे छोटे खेळ खेळणे गरजेचे असते. यातून मुलांना आनंद तर मिळतोच परंतु मोबाईलचा अतिरेकी वापर देखील कमी होतो. मोबाईलची अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा. अभ्यास करत असताना मोबाईल दूर ठेवा. समोर टेबलवर मोबाईल ठेवू नका. मोबाईल दुसऱ्या खोलीमध्ये ठेवा.अशा पद्धतीने प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक मुलांना मोबाईलचा वापर कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज मुले ही देशाची भविष्य आहेत ,आधारस्तंभ आहेत आणि या मुलांना योग्य पद्धतीचे संस्कार करणे, योग्य वळण लावणे गरजेचे आहे .मुलांच्या हातातला अतिरेकी मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे. मोबाईल हा भस्मासुर असून तो मुलांचे आयुष्य उध्वस्त करण्यास निघालेला आहे .त्यामुळे प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक मुलांचा मोबाईलचा कमीत कमी वापर करणे गरजेचे आहे. परंतु यासाठी स्वतः पालकांनी देखील योग्य आचरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक मातापित्याने घरामध्ये मोबाईल कमीत कमी वापर मुलासमोर करणे जेणेकरून आपल्या आचरणातून मुलांसमोर आदर्श निर्माण करता येईल ही काळाची गरज आहे. मा जिजाऊ यांनी बालशिवबावर ज्या पद्धतीने सुसंस्कार केले त्याच्या पद्धतीचे सुसंस्कार करणे ही प्रत्येक मातेची जबाबदारी आहे . मा जिजाऊ यांनी शिवबांना रामायण, महाभारत यांच्या गोष्टी सांगून आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतील अशा पद्धतीचे सुसंस्कार जिजाऊंनी केले .अशा पद्धतीचे सुसंस्कार करण्यासाठी प्रत्येक माता पिता यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने मुलावर योग्य पद्धतीचे सुसंस्कार करण्यासाठी व मुलांच्या हातातील मोबाईलचा कमीत कमी वापर करण्यासाठी प्रत्येक माता ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे व आज हे काळाची गरज आहे.आज ऑस्ट्रेलिया या देशाने 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णता बंदी केली आहे तशा पद्धतीचा कायदाच ऑस्ट्रेलियाने केलेला आहे. अगदी त्याच प्रकारचा कायदा जगातील अनेक देश करत आहेत .आज सोशल मीडियाच्या वापरावर मुलांना मर्यादा निर्माण करणे गरजेचे बनलेले आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवात केलेली अनेक देश त्या अनुषंगाने पावले टाकत आहेत. भारताने सुद्धा अठरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यासंदर्भात मर्यादा निर्माण करणे गरजेचे आहे जेणेकरून मुलांच्या हातामध्ये मोबाईल जाणार नाही व मुले मोबाईलचा कमीत कमी वापर करतील व देशाची पिढी चांगले निर्माण होईल. प्रत्येक देशामध्ये असे कायदे करणे आज काळाची गरज बनलेली आहे. विविध कंपन्यांनी सुद्धा अठरा वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून शासन सोशल मीडियासाठी जागरूकता निर्माण करून लोकांमध्ये मुलांमध्ये जागरूकता निर्माण करेल व कंपन्यांनी सुद्धा करा तितकेच सहकार्य करणे व सुजाण नागरिकांनी सुद्धा तशा पद्धतीची भावना मुलांमध्ये निर्माण करणे ही काळाची गरज बनलेली आपणास दिसून येते.

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना