Happy Marriage Life
*हॅपी मॅरेज लाईफ*
पती-पत्नी ही संसार रुपी रथाचे दोन चाके आहेत. पती-पत्नी नाते हे अतिशय पवित्र विश्वासाचे, प्रेमाचे प्रतीक मानले जाते .संसार करत असताना पती-पत्नीचे नाते हे एकमेकाला समजून घेणारे असणे अत्यंत आवश्यक आहे .पती-पत्नीच्या नात्यांमध्ये जर बेबनाव असेल ,ताणतणाव असेल, विश्वासार्हता नसेल तर पती-पत्नी या नात्यांमध्ये वितृष्ट निर्माण होते व विनाकारण गृहकलह निर्माण होतो व या गोष्टीचा शेवट तान तणाव, चिंता, इर्षा या गोष्टींमध्ये होत असते. म्हणून पती आणि पत्नीने एकमेकांना समजून घेऊन जीवन जगणे अत्यंत महत्त्वाचे असते .पती-पत्नीमध्ये विनाकारण होत जाणारे भांडण हे सुखी संसारासाठी योग्य गोष्ट नसते .जुन्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती. संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे पती-पत्नीमध्ये जरी काही कारणास्तव बेबनाव झाला तरी घरातील जेष्ठ मंडळी ,मोठी मंडळी या नात्याला सावरून घ्यायचे. त्यांच्यातील गैरसमज दूर करायचे .परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेले आहे .नवरा बायको व दोन मुले एवढेच सुखी संसाराची व्याख्या लोकांची बनलेली आहे. याचा परिणाम असा होत आहे की जर पती-पत्नीमध्ये जर काही कारणामुळे बेबनाव निर्माण झाला ,गैरसमज निर्माण झाले वितृष्ठ आले तर या नात्याला समजावून सांगणारे जेष्ठ मंडळी आज कुटुंबामध्ये नाही .त्यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे.प्रत्येक आई-वडिलांना आज असे वाटत आहे की माझ्या मुलीचा विवाह अशा स्थळी मी करणार की ज्या कुटुंबामध्ये आई-वडील जवळ राहत नाहीत .भावाचे लग्न झालेले आहे ,ननंदचे लग्न झालेले आहे केवळ एकुलता एक मुलगा तो पण नोकरीवाला, चाकरीवाला, गाडीवाला बंगलेवाला असावा अशी आई-वडिलांची अपेक्षा आहे .याचा परिणाम कुटुंबसंस्था धोक्यात आलेली आहे. वास्तविक पाहता पती-पत्नीचे भांडण म्हणजे शेजाऱ्यांना विनातिकिटाचा चित्रपट आहे असे म्हटले जाते .पती-पत्नी यांच्या बेबनावामुळे, गैरसमजामुळे पती-पत्नीचे नाते तुटण्याचा संभव असतो .मानसिक त्रास दोघांनाही होतो किंबहुना कुटुंबातील सर्व सदस्यांना होत असतो. *पती-पत्नीच्या भांडणाचे परिणाम* *1) कुटुंबात चिंता, ताण तणाव ,राग ,क्रोध शारीरिक स्वास्थ्य बिघडते*
पती-पत्नीचे नाते हे विश्वासाचे ,त्यागाचे प्रेमाचे प्रतीक असल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये जर विनाकारण दोघांमध्ये भांडण होत असेल तर यामुळे दोघांनाही चिंता ताण-तणाव यांचा या समस्यांचा सामना करावा लागतो .विनाकारण शारीरिक स्वास्थ्य बिघडून जाते. त्यामुळे पती-पत्नी हे संसाररुपी रथाची महत्त्वाची चाके असल्यामुळे दोघांनाही एकमेकांना समजून घेणे, दोघांच्याही मतांचा आदर करणे व त्यातून योग्य मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे. आज आधुनिकीकरणाच्या युगामुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत .म्हणून दोघांनी एकमेकाला समजून घेणे ही आज काळाची गरज बनलेली आहे.
*2) घटस्फोटाचे वाढते प्रमाण*
पती-पत्नीतील गैरसमजुतीमुळे आज पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे .वास्तविक पाहता मोबाईलचा अतिरेकी वापर ,किंबहुना आईचा मुलीच्या संसारात होत असलेला हस्तक्षेप या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आज घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे .जुन्या काळामध्ये मुलीला जरी काही त्रास असेल तर कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी समजावून सांगत होती .त्यामुळे त्या मुलीच्या मनामध्ये एक मानसिक आधार निर्माण होत होता .परंतु आज अनेक कुटुंबातील आई माता आपल्या मुलीला सांगते की तू कोणाचे काही ऐकायचे नाही. तुला काही त्रास झाला तर आम्हाला सांगायचं .नाही तर सरळ माहेरी निघून यायचे. अशा पद्धतीची अरेरावीची भाषा मुलीच्या आईची वाढत असल्यामुळे आज घटस्फोटांचे प्रमाण वाढलेले आहे .किंबहुना मुलांची देखील अशीच अवस्था आहे . त्याचेही आई-वडील त्याला मुली विषयी वेगळ्याच पद्धतीची विचारधाराशी कविता त्यामुळे दोघांमध्ये विनाकारण गैरसमज ताण तणाव कलह निर्माण होत असलेला आपणास दिसून येतो.परंतु पती-पत्नी यांनी दोघांनीही एकमेकांना समजून घेणे. नातेसंबंध त्यागाने, प्रेमाने जोपासणे ही काळाची गरज आहे.
*3) पती-पत्नीच्या भांड्यांचा मुलावर वाईट संस्कार होतात* पती-पत्नीच्या भांडणामुळे आज मुलावर वाईट संस्कार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे .अमेरिकेमध्ये विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे तेथील कुटुंब संस्था धोक्यात आल्यामुळे तेथील मुलांवर अतिशय वाईट परिणाम होत आहे .मुलांना कुठल्याही पद्धतीचे सुसंस्कार नसतात .नकारात्मक मानसिकतेची मुले अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. परंतु भारतामध्ये आज पाश्चात्य राष्ट्रांचे अनुकरण करण्याची पद्धती लोकांनी अवलंबिल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. सोशल मीडिया, मोबाईल यांच्या अतिरेकी वापरामुळे त्यांच्या नात्यांमध्ये विसंवाद निर्माण होत आहे. एकमेकांचा एकमेकावर विश्वास राहिलेला नाही. वास्तविक पाहता पती-पत्नीच्या मोबाईल ला पासवर्ड असण्याची आवश्यकता नाही कारण दोघांचे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक असले पाहिजे .एकमेकांच्या नात्यावर विश्वास असला पाहिजे .परंतु पती-पत्नी यांनी एकमेकांना सुखी राहण्यासाठी या नात्यांमध्ये विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे .त्यामुळे पती आणि पत्नी यांना या दोघांचा संसार सुखी करायचा असेल तर पती-पत्नीने काही सिद्धांत पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
* *सुखी संसाराचे सिद्धांत _नियम* * *1) आहे त्यात समाधान मानणे* पती-पत्नी यांनी जर दोघांमध्ये भांडण होऊ द्यायचे नसेल तर संत तुकाराम महाराज म्हणतात की म्हणतात की ठेविली आनंदे तैसेची रहावेl चित्ती असू द्यावे समाधान ll या सिद्धांतानुसार जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान असणे आवश्यक आहे .आज माणूस माझ्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणून दुःखी नाही तर ती गोष्ट दुसऱ्याकडे आहे याचा त्याला मानसिक त्रास होत आहे म्हणून ईश्वराने आपल्याकडे बहुतेक सुख सुविधा दिलेल्या आहे त्यामुळे आहे त्या सुख सुविधांमध्ये समाधान मानणेआनंद मानणे काळाची गरज आहे. कारण आपल्या गरजा कमी असतील आपल्या गरजा मर्यादित असतील , आपल्या मनाची श्रीमंती असेल तर आपण आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाचा आनंद घेऊ शकतो .केवळ भौतिक सुख सुविधा म्हणजेच सुख नव्हे तर पती-पत्नीचे प्रेमाचे नाते उत्तम आरोग्य यासोबतच नातेवाईकांची असलेली विश्वासार्हता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या सुखाच्या व्याख्येमध्ये होत असतो. त्यामुळे प्रत्येक पती-पत्नी यांनी आहे त्यात समाधान मानणे आवश्यक आहे .जे माझ्याकडे नाही याचे दुःख न करता जे माझ्याकडे आहे ईश्वराने मला जी गोष्ट उपलब्ध करून दिलेली आहे त्या सर्व गोष्टीविषयी ईश्वराकडे आपण दररोज सकाळी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे .कारण तुमच्याकडे जे आहे किंबहुना एवढेही इतरांकडे नाही. आपण इतरांचा विचार केला पाहिजे सायकलवर चालणाऱ्याने पायी चालणाऱ्याचा विचार केला पाहिजे. सायकल वाल्यांनी मोटरसायकल वाल्याचा विचार न करता आपल्यापेक्षा कमी स्तरातील लोकांचा विचार केला तर माणसाला दुःख होत नाही .अन्यथा आपण विनाकारण दुखास कारणीभूत होत असतो.
* *2) नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर सन्मान करणे*
* आज कुटुंब संस्थेमध्ये पती-पत्नीच्या नात्यांमध्ये पती-पत्नीचा एकमेकांचाआदर करण्याची संस्कृती लोप पावत आहे. विनाकारण दोघांचे भांडण होत आहेत .यामुळे पती आणि पत्नी या नात्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी, पती-पत्नीने दोघांचाही आत्मसन्मान जपणे अत्यंत आवश्यक आहे .पतीला जेवढा आत्मसमान आहे तेवढाच आत्मसन्मान स्त्रीला सुद्धा आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांचा आत्मसन्मान जपून एकमेकांच्या नातेवाईकाविषयी आदरभाव ठेवणे आवश्यक आहे. पत्नीने देखील पतीच्या नातेवाईकांची काळजी करावी व पतीने पत्नीच्या नातेवाईकांची माहेरच्या लोकांची काळजी करणे अत्यंत आवश्यक आहे. तरच दोघांमध्ये सुखी संसार होऊ शकतो .घरातील वातावरण आनंदी राहू शकते.
* *3)आपल्या संसारात दुसऱ्यांचा हस्तक्षेप होऊ न देणे*
* पती-पत्नीच्या नात्यांमध्ये आज मुलाकडून आणि मुलीकडूनही त्यांच्या आई-वडील किंवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप होत आहे. या हस्तक्षेपामुळे पती-पत्नीच्या नात्या चे पावित्र्य धोक्यात आलेले आहे. कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेल्या आहे. त्यामुळे पती-पत्नी यांनी दोघांनी सामंजस्याची भूमिका घेऊन दोघांच्याही नातेसंबंध मध्ये सामाजिक्य घडवून आणून त्यांना आपल्या संसारामध्ये हस्तक्षेप करण्यास परवानगी देऊ नये अन्यथा दोघांच्याही संसारातील हस्तक्षेप हा घटस्फोटाकडे घेऊन जाणारा मार्ग ठरत असतो .
* *4) घरातील वातावरण आनंदी ठेवा*
* पती-पत्नी यांनी दोघांच्या संसारामध्ये घरातील वातावरण आनंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दोघांच्याही विचारांचे आचरनाचे संस्कार हे मुलावर घडत असतात. त्यामुळे दोघांचे चारित्र्य व आचरण ही पवित्र असणे अत्यंत गरजेचे आहे दोघांचे संस्कार मुलावर पडत असतात
* त्यामुळे चारित्र्य संपन्न व सुसंस्कार संपन्न पिढी घडविण्याची जबाबदारी ही संबंधित आई-वडिलांचे असते .त्यामुळे मुलावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंददायी असणे ,एकमेकाला समजून घेणे, नातेवाईकांचा मान सन्मान ठेवणे, मुलावर योग्य पद्धतीचे संस्कार करणे ,जेष्ठांची काळजी घेणे या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रत्येक कुटुंबात जर होत असेल तर त्या कुटुंबामध्ये होत असलेला संसार हा सुखी संसार आहे असे आपण म्हणू शकतो .त्यामुळे सुख पैशाने विकत मिळत नाही तर सुख हे समाधान मानण्यामध्ये आहे व सुखाची व्याख्या म्हणजे मर्यादित बहुतूक सुख सुविधांची गरज असेल तर ती व्यक्ती अधिक आनंदी सुखी राहू शकते. त्यामुळे प्रत्येक पती-पत्नी यांनी वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आपल्या संसारामध्ये होत असलेले भांडण थांबविणे व सुखी संसारासाठी या वरील सिद्धांताचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
Comments
Post a Comment