मूल समजून घेताना सकारात्मक पालकत्व

 *मूल समजून घेताना....*

मुलांना चांगले घडवणे चांगले सुसंस्कार करणे,जबाबदार नागरिक तयार करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने सकारात्मक पालकत्व ही जबाबदारी पार पाडत असताना मुलांच्या शारीरिक, मानसिक, भौतिक आध्यात्मिक विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मुलांशी प्रत्येक पालकाचे वर्तन असणे अपेक्षित असते.त्यामुळे प्रत्येकाने मुलाकडून अपेक्षित वर्तन बदल घडवून येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. वास्तविक पाहता सकारात्मक पालकत्व ही एक कसोटी असते. पालकत्व ही एक जबाबदारी आहे आणि त्यामुळे प्रत्येक पालकांनी जबाबदारीने आपल्या मुलाशी वर्तन करणे अत्यंत गरजेचे असते. पाल्य  सुसंस्कार संपन्न करण्यासाठी प्रत्येक पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते यासाठी शिक्षक पालक व समाज या त्रिवेणी संगमातून देशाचा जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी प्रत्येक घटकावर येऊन पडलेली असते. त्यामुळे सकारात्मक पालकत्व  एक आव्हान आहे परंतु हे आव्हान सहजपणे पार करण्यासाठी प्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे व आपल्या पाल्याच्या विकासासाठी स्वतःमध्ये देखील काही अनुरूप बदल घडून आणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने आपले वर्तन करणे गरजेचे असते. 

1) मुलांच्या चुकांना दोष नव्हे तर संधी माना ....अनेक वेळेस मुलांच्या हातून अनेक चुका होत असतात. मुले हे चुका आणि शिका या प्रयत्नावादी दृष्टिकोनातून शिकत असतात थॉर्नडाइकने मांडलेला प्रयत्नावादी सिद्धांत हा मुलांच्या दृष्टिकोनांनुसार अत्यंत महत्त्वाचा असतो. मुले अनेक वेळेस चुका करत असतात परंतु  करत असलेल्या चुकांना प्रत्येक पालकांनी समजून घेणे गरजेचे असते व त्या चुका मुलांच्या लक्षात आणून देऊन ती चूक पुन्हा होणार नाही अशा पद्धतीचे वर्तन मुलाकडून घडून येण्यासाठी प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांनी केलेल्या चुका, दोष  यांना चुकीचे न मानता ती एक मुलांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी आपली संधी आहे हे समजून पालकांचे वर्तन असणे अपेक्षित असते. त्यामुळे मुलांनी केलेल्या चुकाही त्याला सुधारण्यासाठी आपणास मिळालेली संधी आहे असा विचार प्रत्येक पालकांनी करणे गरजेचे असते. 

2) मुलावर रागावणे ऐवजी मुलांना समजून घ्या.... अनेक वेळेस मुले चुका करत असतात त्यामुळे आई वडील पालक यांना केव्हा केव्हा तीव्र राग येतो परंतु प्रत्येक वेळेस मुलांना रागावण्यापेक्षा मुलांनी ती चुक केली अथवा त्या चुकामधून त्याच्यामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी आपण ती मुलांची चूक समजून घेणे गरजेचे असते व ती चूक पुन्हा करू नये यासाठी प्रेमाने त्याच्या लक्षात जर आपण  गोष्ट आणून दिली तर मुलगा ती  चूक करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक दर वेळेस मुलावर रागावणे, त्याला कठोर शिक्षा करणे, शाब्दिक मानहानीकारक वाक्य बोलणे अशा पद्धतीची कृती प्रत्येक पालकांनी टाळणे गरजेचे असते .

3)मुलांना सकारात्मक बोला ....अनेक वेळेस पालक हे मुलांशी बोलत असताना नकारात्मक गोष्टी बोलत असतात. त्यामुळे त्या नकारात्मक बोलण्याचा मुलावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे अनेक वेळेस प्रत्येक पालकांनी मुलांशी नेहमी सकारात्मक बाबीवर चर्चा करावी. मुलांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचे कौतुक करावयाची गुण मुलांमध्ये विकसित करणे गरजेचे आहे अपेक्षित आहे .त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून त्या मुलांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता मुलांना सकारात्मक गोष्टी  आवडल्या जातात. 

4. मुलांना रागाने नव्हे तर प्रेमाने समजावून सांगा.... अनेक वेळेस मुल चुका करत असेल मुलांच्या हातून झालेल्या चुकीची कृतीही त्याला कठोर शिक्षा करून किंवा शब्दाचे फटकरे मारून उपयोग नाही तर मुलांनी केलेल्या चुकांना प्रेमाने समजून घेऊन मूल समजून घेत असताना त्यांनी ती चूक का केली कळत नकळत ही चूक जर झाली असेल तर जाणीवपूर्वक पुन्हा मुलगा अशा पद्धतीची चूक करणार नाही यासाठी प्रत्येक पालकांचे वर्तन असणे अपेक्षित असते. त्यामुळे मुलांशी प्रेमाने बोलून आपण त्याच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

5) मुलाशी डोळ्यातून प्रेम व्यक्त करा... अनेक वेळेस मुले चुका करत असाल त्यामुळे दर वेळेस प्रत्येक वेळेस पालकांनी गंभीर होऊन मुलांना शिक्षा करणे रागावणे या बाबी न करता केव्हा केव्हा एखादा प्रेमाचा कटाक्ष जर मुलावर टाकला तर मुले आपली चूक समजून घेतात व पुन्हा ती चूक न करण्याची स्वतः प्रतिज्ञा करतात. त्यामुळे नेहमी नेहमी कठोर शिक्षा न करता पालकांनी मुलाशी प्रेमाने वागणे अत्यंत गरजेचे असते

 6)मुलांना नियम सांगा... मुलांनी केलेल्या चुकासाठी त्यांना शिक्षा करत राहण्यापेक्षा मुलांना नियम सांगा. एखादा नियम सांगितल्यानंतर त्या नियमांचे पालन करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबवा.परंतु जोपर्यंत आम्ही मुलांना नियम सांगणार नाही तोपर्यंत मुलाकडून अपेक्षित वर्तनबदल घडवून येणार नाही. किती वेळ टीव्ही पाहावी ?किती वेळ मोबाईल पहावा ?किती वेळ अभ्यास करावा? सकाळी किती वाजता उठावे ?शाळेमध्ये मुलांमध्ये मित्रांमध्ये कसे वागावे? नातेवाईकांमध्ये कसे वागावे ?याचे नियम प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना करून देणे महत्त्वाचे असते. जेणेकरून त्या नियमाची प्रतिपालन परिपूर्ती मुले करत असतात. 

7)मुलांना विकल्प द्या ...पालकांनी मुलांना एक सूचना वारंवार करण्यापेक्षा पालकांनी मुलांना विकल्प देणे गरजेचे आहे. खेळून आल्यानंतर अभ्यास करतो की अभ्यास करून खेळायला जातो? टीव्ही पाहून झाल्यानंतर अभ्यास करतो की टीव्ही पाहण्यापूर्वी पूर्वी अभ्यास करतो ?यासारख्या विकल्प मुलांना दिल्यानंतर दोन्हीही गोष्टींचा परिणाम हा विधायक असतो चांगलाच असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट मुलांनी केली तरी त्याचा फायदा मुलांच्या विकासासाठी होत असतो .त्यामुळे प्रत्येक वेळेस पालकांनी मुलांना विकल्प देऊन त्याचे कार्यकौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असते.

8)मुलांच्या काही चुकाकडे दुर्लक्ष करा ...मुले म्हणजे देवाघरची फुले

 मुले लहान असतात त्यांच्याकडून अनेक वेळेस चुका होत असतात त्यामुळे दरवेळेस प्रत्येक वेळेस मुलांच्या चुकीला कठोर शब्दात शिक्षा करणे पालकांचे चुकीचे असते. अनेक वेळेस पालकांनी मुलांच्या चुका कडे दुर्लक्ष करणे देखील चांगले असते.  दर वेळेस मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षा करण्यापेक्षा काही गोष्टी त्याच्यावरच सोपून दिल्याच्या नंतर ती गोष्ट त्याच्या लक्षात येते व मुलगा पुन्हा ते चूक करत नाही त्यामुळे वारंवार एकच गोष्टीच्या चुकांसाठी पालकांनी त्या मुलांना दोष देणे चुकीचे असते

9. मुलांना शाबासकी द्या... मुलांच्या चुकीसाठी आपण शिक्षा देत असतो परंतु मुलांनी जर एखादी चांगले काम केले तर त्याच वेळेस मुलांना शाबासकीचे थाप देणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. कारण मुलांसाठी त्याचे प्रबलन महत्वाचे असते व हे प्रकरण पालकाच्या शाबासकीतून मुलांना मिळत असते त्यामुळे पालक जशी शिक्षा करतात असे त्या त्या प्रसंगांमध्ये पालकांनी मुलांना शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर देणे अत्यंत गरजेचे असते .त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. मुले सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू लागतात व मी जर एखाद्या चांगले काम केले तर मला त्या गोष्टीचा चांगला फायदा मिळतो शाबासकी मिळते माझे कौतुक केले जाते अशा प्रकारचे भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण होत असते.

10. पालकाने रागात नेहमी शांत रहावे. मूल समजून घेत असताना पालकांनी जेव्हा आपण रागामध्ये असतो तेव्हा तेव्हा कधी कधी शांत राहणे गरजेचे असते. कारण आपण मुलाची चूक त्याच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर आपण जर कधी कधी शांत राहिलो तर मुलाच्या लक्षात येते की आपले पालक दरवेळेस आपल्या शिक्षा करत नाही तर ते आपल्याला समजून घेतात आपल्याशी चर्चा करतात व आपणही चुक करणार नाही अशा पद्धतीची अपेक्षा पालकाकडून असते. त्यामुळे आपण देखील तशा पद्धतीचे वर्तन करणे अत्यंत गरजेचे असते .हे मुले समजून घेतात त्यामुळे रागाच्या प्रसंगी केव्हा केव्हा पालकांनी शांत राहणे गरजेचे असते.

11)पालकांनी मुलांचे वय व समज लक्षात घ्यावी...प्रत्येक पालकांनी मुलांना समजून घेत असताना मुलांचे वय व त्याला त्याच्याकडून अपेक्षित असणारा वर्तन बदल लक्षात घेणे गरजेचे असते. सकारात्मक गोष्टी करत असताना किशोरवयीन मुलाशी पालकांनी चर्चा करताना वास्तववादी दृष्टिकोनातून बोलणे अत्यंत आवश्यक असते. अतिरंजीत किंवा स्वप्नात रममान होणाऱ्या गोष्टी मुलांशी चर्चा करण्यापेक्षा वास्तववादी दृष्टिकोनाचे भान ठेवून प्रत्येक पालकांनी मुलांकडून अपेक्षित वर्तन बदल करून घेण्यासाठी मुलांना वास्तववादी गोष्टीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक असते. वास्तववादी दृष्टिकोन मुलांच्या मनामध्ये निर्माण करून मुलांना शिक्षणामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची कला पालकांनी शेतकऱ्यांनी अत्यंत आवश्यक असते.

12) मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा असावी... 

मुलांच्या मोबाईल वापरण्यावर मर्यादा असणे अत्यंत गरजेचे असते कारण आपला पाल्य किती वेळ मोबाईल पाहतो हे पाहणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आ.हे त्यामुळे जेवण करत असताना मुलाने मोबाईल पाहू नये, अभ्यास करत असताना मोबाईल चा कमीत कमी वापर करून अभ्यास करणे काळाची गरज बनलेली आहे .कारण आज मुलांना मोबाईल पाहू नका असे म्हणणे अशक्य असून कमीत कमी मुलांना मोबाईलचा वापर करण्याची सवय लावणे ही आज काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने मुल समजून घेत असताना मोबाईलच्या अतिरेकी वापरावर मर्यादा आणून मुलांना डोळ्याचे मायोपियायासारखे विकार होणार नाहीत यासाठी प्रत्येक पालकांनी काळजी करणे अत्यंत आवश्यक असते. वरील पद्धतीने प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याशी वर्तन करणे अपेक्षित असते जेणेकरून मूल समजून घेत असताना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला जावा.

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना