स्मितहास्य आनंद जीवनाची गुरुकिल्ली
स्मितहास्य आनंदाची गुरुकिल्ली
स्मितहास्य हे मनुष्य प्राण्याला मिळालेली दैवी देणगी आहे. ईश्वराने सजीव सृष्टी मध्ये फक्त मनुष्याला हसण्याची देणगी दिलेली असल्यामुळे माणूस कायम हसत असतो. स्मितहास्य दिन हा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक स्मितहास्य दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये हास्यदिन आणि स्मितहास्य दिन हे वेगवेगळे आहेत . खळखळून मोकळे हसणे हे वेगळे आणि स्मितहास्य करत हसणे यामध्ये खूप मोठा फरक आहे . स्मितहास्य हे स्वतःहून केले जाऊ शकते , स्मित असेही स्वतःहून केलेली कृती असते मनातील भावभावना सहजपणे व्यक्त करणारी कृती म्हणजे स्मितहास्य,तर विराटहास्य हे दुसरे कोणीतरी खळखळून हसायला भाग पाडलेले असते .माणसाच्या संवादाची सुरुवात स्मितहास्याने केल्यास संवाद नक्कीच हा चांगला होऊ शकतो . सुसंवाद योग्य प्रकारे साधला जाऊ शकतो.आम्ही जीवनामध्ये कधीही हसण्याचा प्रयत्न करत नाही. काही माणसे चेहऱ्यावर कायम ताण तणाव, चिंता, राग, क्रोध घेऊन समाजामध्ये वावरत असतात. केवळ एखादा फोटो काढत असतानाच छायाचित्रकार आम्हाला स्माईल प्लीज असे ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर कळत नकळत स्मितहास्य उमटते आणि त्यामुळे आमचा फोटो अतिशय सुंदर निघतो. जर एखाद्या छायाचित्रासाठी आम्ही एकाच सेकंदासाठी केलेले स्मितहास्य जर आमचा फोटो चांगला काढत असेल तर आमच्या आयुष्याच्या रंगमंचावर आम्ही जर सतत स्मि हास्य करत असो, आणि आम्ही जर असे केले तर आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाचा, सुखाचा ,समाधानाचा व भरभराटीचा जात असतो. त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येकाने स्मितहास्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया ही आपण स्मितहास्याने दिली तर त्याचे परिणाम खूप चांगले निघत असतात. रामायण मालिकेमध्ये असणारे प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल यांनी ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभूंची भूमिका केली त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक स्मितहास्य होते म्हणजेच ते स्मितहास्य म्हणजे एक दैवी देणगी अथवा सर्व संकटावर कशा पद्धतीने मात करायची याचा आधार असते आणि म्हणून ज्या ज्या वेळेस श्रीरामचंद्र प्रभू व लक्ष्मणास वनवासामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला त्या त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांनी केवळ स्मितहास्याने त्या सर्व संकटांवर मात केलेली आपणास पहावयास मिळते. स्मितहास्य केवळ ही देहबोली नाही तर संवाद विश्वासाची, आनंदाचे अनोखी भाषा असते .प्रत्येक नाते अधिक सुंदर करण्याचे सामर्थ्य हे एका हलक्या स्मितहास्यामध्ये दडलेले आपणास पाहायला मिळत असते. स्मितहास्याचे फायदे.... 1)सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. आम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे पाहून स्मितहास्य केले तर आमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला पहावयास मिळतो. आपल्या जीवनामध्ये स्मितहस्यामुळे आपणास सकारात्मक दृष्टिकोन झालेला पाहाव्यास मिळतो. जीवन जगत असताना अनेक वेळेस आपल्याला नकारार्थी दृष्टिकोनाचा सामना करावा लागत असतो. परंतु त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची नवसंजीवनी देण्याचे कार्य केवळ एक स्मितहास्य करत असते.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कायम स्मितहास्य करून जर आपण सकारात्मक चर्चा करत असू तर त्याचे फायदे नेहमी सकारात्मक होऊ शकतात. एखादी कंपनी, दुकान अथवा समाजामध्ये चर्चा करत असताना संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून जर आपण स्मितहास्य करून दुसऱ्याशी संवाद साधू शकत असू तर नक्कीच त्यामधून आपणास सकारात्मक दृष्टिकोन पाहावयास मिळतो.
2. स्मित हास्य मुळे आपुलकीची भावना तयार होते.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे lसाने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे आम्हाला जर इतरांना प्रेम द्यायचे असेल तर त्या पाठीमागे केवळ स्मित हास्य देऊन आम्ही एकमेकांशी सुसंवाद साधू शकतो. स्मितहास्य मुळे आपण कायम प्रसन्न राहू शकतो व कायम प्रसन्न राहिल्यामुळे आपल्या कार्याची कार्यसिद्धी खूप चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपलेपणाचे भावना निर्माण करण्यासाठी स्मितहास्य करणे अत्यंत गरजेचे असते. स्मितहास्य म्हणजे एखादे नाजूक असणारे जाई ,जुई ,चमेली यासारखे छोटेसे फुल ज्या प्रमाणात सुंदर दिसत असते त्या प्रमाणामध्ये आमचं स्मितहास्य हे नाजूक मनमोहक असते.
3. स्मितहास्य केल्यामुळे ताण तणाव कमी होतो. प्रत्येक व्यक्ती आज आधुनिकीकरणाचे युगामध्ये जीवन जगत असताना अनेक ताणतणाव , नैराश्य, चिंता ,चिडचिडेपणा, क्रोध, भिती , अपयश या सर्व गोष्टींचा सामना करत आहे .परंतु आम्ही जर समोरच्या व्यक्तीला केवळ एक स्मितहास्य दिले तर त्या व्यक्तीची आमच्या सोबत सुसंवाद साधण्याची भावना बदलते व आमच्यामध्ये असलेली चिडचिड, ताणतणाव ,भीती, अपराधीपणाचे भावना ,नैराश्य या सर्व गोष्टीवर मात करण्याचे एक सुवर्णसंधी म्हणजे स्मितहास्य आहे. त्यामुळे आम्ही जीवनामध्ये एकमेकास भेटल्यानंतर सहज स्मिताहास्य करणे अत्यंत गरजेचे असते की ज्यामुळे आमच्या मनामधील ताण-तणाव व भीती दूर होऊन ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करायचे याचा प्रभावी मार्ग म्हणजे स्मितहास्य आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी एक प्रभावी औषध म्हणून आपण स्मितहास्य ओळखू शकतो.
4. स्मितहास्य केल्यामुळे नातेसंबंधांमध्ये सुधारणा होते. आज आधुनिकीकरणाचे युगामध्ये नातेसंबंधांमध्ये कटूता निर्माण होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कुटुंबामध्ये संयुक्त पद्धतीचा ऱ्हास होऊन विभक्त कुटुंब पद्धती वेगाने झपाटलेली आम्हास पाहावयास मिळते. अमेरिका ,रशिया ,फ्रान्स ,ब्रिटन यासारख्या पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये असलेले विभक्त कुटुंबपद्धती आज भारतातील अनेक कुटुंबामध्ये तयार होत असल्यामुळे व संयुक्त कुटुंब पद्धती याचा ऱ्हास होत असल्यामुळे आज समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचा वापर खूप वाढलेला आहे आणि अशा प्रसंगांमध्ये आमचे नातेसंबंध, नातेसंबंधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कटूता निर्माण होत असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये वेगळेपणाचे भावना आपणास दिसून येते. परंतु नाते संबंधांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ,सुधारणा करण्यासाठी कुटुंबामध्ये जर आम्ही एकमेकांना स्मितहास्य देऊन देऊन जर सुसंवाद साधू शकत असो तर नक्कीच त्या गोष्टीमधून आमच्यामध्ये नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची भावना निर्माण होते. आपुलकीची , जिव्हाळा ,माया, ममता, करुणा या गोष्टींची भावना निर्माण झाल्यामुळे आमच्या मध्ये नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होते यासाठी प्रत्येकाने स्मितहास्य देऊन सुसंवाद साधणे अत्यंत काळाची गरज बनलेली आपणास पहावयास मिळते.
5. स्मितहास्य केल्यामुळे नेतृत्वगुण विकसित होतात . स्मित हास्य करण्यामुळे आमच्या मध्ये असलेले नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते. कुठलेही कार्य करण्यासाठी नेतृत्वाची अत्यंत गरज असते आणि असे नेतृत्व हे समाजातील विविध घटकासाठी अत्यंत आवश्यक असते. राजकारण, समाजकारण अथवा ऑफिस ,कार्यालय आता समाजामध्ये जीवन जगत असताना नेतृत्वगुणांच्या दृष्टिकोनातून आम्ही कार्य करत असणे गरजेचे असते आणि अशा प्रसंगांमध्ये आमचे एक स्मितहास्य असे आम्हाला नेतृत्व शिखरावर घेऊन जात असते. आम्हाला यशाच्या शिखराचा शिरोबिंदू गाठण्यासाठी आमच्याकडे स्मितहास्य करण्याची कलाअसेल आमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असेल तर आम्ही नक्कीच या गोष्टीतून मार्गक्रमण करत असताना आमच्यामध्ये नेतृत्वगुणांचा विकास झालेला आम्हास पाहावयास मिळत असतो.
6. स्मितहास्य केल्यामुळे राग, क्रोधावर नियंत्रण ठेवता येते. राग, क्रोध यांच्यावर आम्ही नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे, आपल्या स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी, व आत्मिक शांती व समाधानासाठी, आम्ही स्मितहास्य ही कला अवगत करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजामध्ये जीवनामध्ये ताणतणाव चिडचिडेपण आम्ही आम्ही यावर मात करण्यासाठी स्मित हास्याचा योग्य पद्धतीने वापर करून आम्ही आत्मिक शांती प्राप्त करू शकतो.कारण स्मिताहास्याच्या माध्यमातून आम्ही संकटावर मात करू शकतो .स्मितहास्य हेसामाजिक सुधारणा करून आणण्यासाठी एक प्रभावी औषधोपचार म्हटले जाते. त्यामुळे स्माईल (SMILE )हा पाच अक्षरी जरी शब्द असला तरी त्या स्मितहास्य मुळे आम्हाला नातेसंबंधांमध्ये विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्व असलेले आपणास दिसून येते .प्रत्येक नाते अधिक सुंदर करण्याचा सामर्थ्य एका हलक्या आमच्या स्माईलमध्ये दडलेले आपणास पाहावयास मिळते.
7. स्मितहाच्या मुळे आमचा मूड चांगला राहतो .मानवी शरीरामध्ये ज्यावेळेस आम्ही स्मितहास्य करत असतो त्यावेळेस आमचा मेंदू आमच्या शरीरामध्ये अँड्रॉफीन नावाचे द्रव्य स्त्रवतअसते .जे की आम्ही सतत धावल्यामुळे आमच्या शरीरामध्ये निर्माण होत असते परंतु हेच द्रव्य केवळ स्माईल केल्यामुळे सुद्धा ,केवळ स्मितहास्य यामुळे सुद्धा आमच्या शरीरामध्ये निर्माण होत असते त्यामुळे आमचा मूड चांगला फ्रेश राहतो
8. आमच्या जीवनामध्ये आनंदी दृष्टिकोनाची भावना निर्माण करण्यासाठी स्मितहास्य अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आमचा मूड चांगला राहून आनंदाचे व्यवस्थापन व्हावे व आमच्या मनामध्ये संकटाशी दोन हात करण्याची ताकद केवळ स्मितहास्यातून निर्माण होत असते .
आनंदी जीवन जगण्यासाठी आमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणे अत्यंत गरजेचे असते .त्यामुळे ऑटोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील दर शुक्रवारी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्माईली डे मोठ्या स्वरूपामध्ये साजरा केला जात असतो .आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आमच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य ठेवून प्रत्येक संकटाशी सामना करण्याचा, मुकाबला करण्याचा ,सामर्थ्याने अडचणीवर प्रयत्न करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जीवनामध्ये आम्ही नेहमी स्मितहास्य करणे अत्यंत गरजेचे असते. स्मितहास्याच्या माध्यमातून आम्ही अनेक संकटावर मात करत असतो. त्यामुळे मानवी जीवनामध्ये ईश्वराने केवळ मानवास दिलेली दैवी देणगी म्हणजे स्मित हास्य आहे. स्मिताहास्य ही देवी देणगी आम्ही काळानुसार जपणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून खळखळून हास्य व स्मित हास्य यामध्ये जरी फरक असला तरी केवळ स्मितहास्य हे आम्ही जाणून-बुजून स्वतः केलेली कृती असते ती प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावी अशी अपेक्षा असते. चला तर मानवी जीवनाच्या आनंदाचा शिरोबिंदू म्हणजे स्मितहास्य असल्यामुळे आपण सर्वजण दररोज स्मितहास्य करू या एकमेकांकडे पाहून केलेले स्मितहास्य आमच्या अनेक अडचणींचा संकटांचा सामना करण्याची शिदोरी आम्हाला देत असते. स्मितहास्य ही आम्हाला लाभलेली ऊर्जा आहे. प्रत्येकाने स्मितहास्य करून ही ऊर्जा जपूया व प्रत्येकाने जीवनामध्ये आनंदी ,सुखी ,समाधान आणि आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. सर्वांनी सामूहिकपणे जाणीवपूर्वक ऑक्टोबर महिन्यातील पहिला शुक्रवार जागतिक स्मितहास्य दिन म्हणून साजरा करूया.
श्री. गोपीचंद बर्डे लातूर 9922976560
Comments
Post a Comment