पती-पत्नी नाते सांभाळा

 *पती-पत्नी नाते सांभाळा*

 पती-पति पती-पत्नीमध्ये असलेले नाते हे प्रेमाचे विश्वासाचे प्रेमाचे प्रतीक असले पाहिजे. कुटुंब संस्थेचा आधार म्हणजे पती-पत्नीचे प्रेमाचे साहचर्याचे त्यागाचे संबंध असतो. प्राचीनकाळी असणारी एकत्र कुटुंब पद्धती आज नाहीशी होत  आहे . आधुनिकीकरणाच्या युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रचार आणि प्रसार वाढत आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलावर चांगले सुसंस्कार केले जात असत. परंतु 21 व्या शतकामध्ये कुटुंब संस्थेमध्ये  बदल झालेला आहे. पाश्चातीकरणाच्या अंधानुकरणामुळे  विभक्त कुटुंब पद्धतीचे जाळे प्रत्येक कुटुंबामध्ये पसरले जात आहे. त्यामुळे मुलावर संस्कारांचा प्रश्न मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होत आहे. पूर्वीच्या काळी घरातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी कळत नकळत मुलावर सुसंस्कार करत असत. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरामध्ये ज्येष्ठांना स्थान उरले नाही. याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर सुसंस्कार करण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुटुंबातील पती आणि पत्नींना या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. पती-पत्नी हेच संसाररूपी रथाची दोन प्रमुख चाके आहेत. त्यामुळे पती आणि पत्नी यांनी मुलावर जाणीवपूर्वक सुसंस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे.परंतु जर आई-वडिलांचे मुलासमोरच भांडण होत असेल तर त्या नात्यांमध्ये असणारा गोडवा कमी होतो व त्या नात्यांमध्ये कटूता वाढत जाते व पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कटुता एकदा निर्माण झाली की पुन्हा त्यामध्ये प्रेमाचे आनंदाचे बोलणे करणे अवघड होऊन जाते. त्यामुळे पती आणि पत्नीने कुटुंब संस्थेमध्ये आदर्श विचारधारा निर्माण करणे गरजेचे पालकत्व ही एक जबाबदारी आहे व प्रत्येक पती-पत्नी यांनी पालकत्व ही जबाबदारी ओळखून कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून पती-पत्नीचे नाते सांभाळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

 1. मुलासमोर भांडणे करू नका.

 पती आणि पत्नीने मुलावर सुसंस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु जर पती आणि पत्नी मुलांच्या समोर भांडण करत असतील तर मुलांच्या निरागस मनावर त्याचा अतिशय वाईट परिणाम होत असतो. पती-पत्नीचे होणारे भांडण हे मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक वाढीसाठी निरर्थक ठरत असते. त्यामुळे पती आणि पत्नीने त्यांचे होणारे भांडण मुलांसमोर करू नये .शक्यतो त्यांनी भांडणेच करू नये कारण मुले जरी शांत दिसत असली तरी त्यांना सर्व जाणवतं व ते काही बोलत नाहीत परंतु आई-वडिलांचे ताणतणाव त्यांना जाणवत असतात व पती-पति मध्ये असणारे ताणतणावाचे संबंध हे मुलांच्या विकासासाठी दुरुपयोगी ठरतात 

*2.पती पत्नी मधील भांडण मतभेद चर्चेने सोडवा* 

पती आणि पत्नी यांच्यामध्ये जरी भांडण होत असेल तरीसुद्धा पती आणि पत्नीने दोघांनी सामंजस्याची भूमिका घेऊन मुलांच्या विकासासाठी मुलांच्या हितासाठी व मुलांच्या शारीरिक ,मानसिक भावनिक,कौशल्याच्या विकासासाठी पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद त्यांनी सामाजिक आणि चर्चेच्या  मार्गातून सोडविणे अत्यंत आवश्यक आहे .यासाठी दोघांनी संयम राखणे अत्यंत आवश्यक असते. आज प्रत्येक कुटुंब संस्थेमध्ये घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असलेले दिसून येते 

आधुनिकीकरणाच्या युगामध्ये घटस्फोटाचे वाढत असलेले प्रमाण हे चिंतेचा विषय बनत असलेले पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे. त्यामुळे प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा आदर व सन्मान करण्यासाठी कुटुंबिक व्यवस्था टिकविणे गरजेचे आहे. यासाठी पती-पत्नीचे मुलावर चांगल्या पद्धतीचे सुसंस्कार करणे गरजेचे आहे. विनाकारण पती-पत्नीच्या नात्यांमध्ये कटूता निर्माण न होता त्याग प्रेम या भावना रुजविणे गरजेचे आहे. *3.पती-पत्नीने त्यांच्या नात्यांमध्ये संयम ठेवावा*.

प्रत्येक कुटुंबामध्ये पती-पत्नीमध्ये जरी संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले तरी दोघांनीही संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले जाते की संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरेच उद्देश शांतपणे जिंकता येतात. कारण जगाचा कटूपणा कितीही अनुभवला तरी स्वतः मधला गोडवा माणसाला कायमपणे जपता आला पाहिजे आणि असं कुठलंही सुख नाही की ते आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे की ते आपल्याला आयुष्यभर समाधान देऊन जाईल.  त्यामुळे पती आणि पत्नीने त्यांच्या कठीण प्रसंगांमध्ये संयम ठेवून शांतपणे मार्ग काढणे अत्यंत आवश्यक असते. पती-पत्नींचा असणारा संयम हाच कुटुंबाचा आधार बनत असतो. त्यामुळे पती-पत्नीने संयम ठेवून कार्य करणे गरजेचे असते. 

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कुटुंबीय व्यवस्था टिकविणे गरजेचे बनलेले आहे .त्यामुळे पश्यातीकरणाच्या अंधानुकरण करण्याचा मार्ग न अवलंबिता प्रत्येक पती-पत्नीने जाणीवपूर्वक आपल्या मुलावर सुसंस्कार करणे हे काळाची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना