पालकत्व व मुलांना शिक्षा......... सकारात्मक पालकत्व

 *सकारात्मक पालकत्व* 

 अनेक पालक आपल्या मुलाला योग्य सुसंस्कार करण्यासाठी ,त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्यासाठी कधी कधी प्रेमाने तर कधी कधी कठोर पद्धतीने शिक्षा करत असतात. चाणक्य  सांगतात की ,आपल्या पाल्याचा विकास करण्यासाठी शून्य ते सहा वर्षे वयोगटापर्यंत आपण आपल्या मुलाचे अत्यंतिक लाड करा. सहा ते अठरा वर्ष वयापर्यंत मलाच कठोर शिस्तीमध्ये त्याच्यावर सुसंस्कार करा व अठरा वर्षाच्या पुढे तुम्ही त्याला तुमचा मित्र माना. या पद्धतीनुसार आम्ही पालकत्वाचे कार्य करत असताना सकारात्मक पद्धतीने मुलावर सुसंस्कार करणे, मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर सुसंस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु अनेक वेळेस पालक मुलांचा आपल्यावर होणारा ताणतणाव असह्य झाल्यामुळे मुलांना अनेक वेळेस  कठोर शिक्षा करतात .मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलांना वारंवार शिक्षा करणे हे चुकीचे आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवण्यासाठी मुलांना वारंवार भीती दाखवणे, त्यांना कठोर शिक्षा करणे हे चुकीचे असते व त्याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वविकासावर होत असतो. त्यामुळे आपण मुलांना शिक्षा करणे सर्वात चुकीचे आहे. 

*पालकत्व व मुलांची शिक्षा*

 1. आम्ही मुलांना त्यांच्या चुकीसाठी शिक्षा करत नाही तर स्वतःवर होणारा असह्यताणामुळे आम्ही मुलांना शिक्षा करतो. एखाद्या सरकारी कार्यालयातून साहेब घरी आले आणि  मुलांचा घरी गोंधळ चालू असेल तर ऑफिसमधला ताण-तणाव त्यांना घरी असह्य होतो व त्यामुळे मुलांच्या छोट्या चुका, छोटासा गोंधळ देखील पालकांना नकोसा वाटायला लागतो . पालकांमध्ये चिडचिड ताण तणाव राग क्रोध निर्माण होतात. त्यामुळे मुलांना ते  कठोर शिक्षा करू लागतात. त्यामुळे सकारात व पालकत्व या गोष्टीचा विचार करत असताना पालकांनी मुलांना शिक्षा करणे रागावणे हे चुकीचे आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार या गोष्टींचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. वारंवार पालकांचे रागावणे असेल तर अशी मुले हट्टी बनतात. पालकत्व मध्ये ही पद्धती कसा आहे चुकीची आहे. आपण  आपल्या मुलांना चुकीसाठी नाहीतर स्वतःच्या असह्य तणावामुळे  शिक्षा करतअसतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक काम त्या त्या ठिकाणी करणे गरजेचे असते. ऑफिसमध्ये काम ऑफिसमध्ये करा. व्यवहारातील ताण तणाव व्यवहारातच राहायला पाहिजे व घरी येताना आम्ही एक पालक म्हणून  आमचा प्रवेश घरी झाला पाहिजे. घरी आम्ही साहेब नाही व ऑफिसमध्ये आम्ही पालक नाही. म्हणून ज्या ठिकाणची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे .ज्या ज्या ठिकाणी जी भूमिका आमच्या वाट्याला आलेली आहे तीच भूमिका  पार पाडली पाहिजे आणि घरी एक आदर्श पती ,आदर्श बाबा व समाजामध्ये एक समाजाचा जबाबदार म्हणून आमचे वर्तन असले पाहिजे. ऑफिसमध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही आमचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे .आम्ही मुलांना शिक्षा का करतो

2. आम्ही आमच्या भावभावनावर नियंत्रण ठेवू शकत नाही .त्यामुळे आम्ही मुलांना शिक्षा करतो. आमचे ताणतणाव, चिडचडेपणा, स्वतःच्या समस्या या सर्व गोष्टीचा परिणाम आम्ही मुलावर रागवण्यामध्ये करत असतो .त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण बाहेरच्या गोष्टीचा ताण किंवा इतर व्यवहारातील त्यांना मुलावर काढणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही तर मुलांना वारंवार रागवत असतो त्यांच्यावर सतत चिडचिडेपणा करत असो त्यांना कठोर कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा मुलांच्या मनामध्ये आपल्या पालका विषयी राग, द्वेष भीती निर्माण होते. अशी मुले पालका विषयी नीट सुसंवाद साधू शकत नाहीत. अशी मुले पालकांचा आदरभाव न करता त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात 

3. मुलांना मारणे म्हणजे शिस्त नाही . पालक या नात्याने ज्यावेळेस आम्ही मुलांना कठोर शिक्षा करतो त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु केवळ मारण्यातून रागावण्या तर मुलांना शिस्त लागत नाही तर शिस्त पालनाची सवय मुलांना लागावी म्हणून पालकांनी काळजीपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. शिस्त पाळण्याची आपले काम योग्य पद्धतीने करण्याची आपल्या हातून चुका न होऊन देण्याची काळजीपूर्वक काम करण्याची पद्धती पालकांनी मुलांमध्ये विकसित करणे अत्यंत गरजेचे असते.

*4. तो आपल्या वेदनेचा उद्रेक असतो.* आपण ज्यावेळेस मुलांना करतो शिक्षा करत असतो त्यावेळेस मुलांना मारणे म्हणजे हा शिस्तीसाठी नाही तर आमच्या मनामध्ये असणारी वेदना व त्या वेदनेचा उद्रेक म्हणजे मुलांना शिक्षा करणे असते असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. 5.मूल चूक करतात पण त्यांना समजून घेणे एक यशस्वी पालकत्वाची जबाबदारी आहे .

मुले म्हणजे देवाघरची फुले . मुले आयुष्यामध्ये चुका करतच असतात . मुलांच्या झालेल्या चुका सुधारून त्याच्यामध्ये शिस्त लावणे व मुलांना समजावून सांगणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य असते .त्यामुळे आम्ही मुलांना समजून घेणे ही एक आपली यशस्वी पालकत्वाची जबाबदारी आहे. मुलांच्या हातून चुका होतच असतात. परंतु झालेल्या चुकावर योग्य मार्ग काढणे हे अत्यंत आवश्यक आहे.

 6. पालकत्व एक जबाबदारी-

हिंसा हे उत्तर नाही .पालकत्वाशी एक आमची जबाबदारी आहे मुलांना शिक्षा करणे . मुलांना कठोरात कठोर शब्दांमध्ये बोलणे,  हे त्यावर उत्तर नाही. म्हणून प्रत्येक पालकांनी पालकत्व ही एक आपली जबाबदारी आहे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. 

श्री. गोपीचंद बर्डे लातूर

Comments

Popular posts from this blog

आनंदी जीवन

सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका

मूल समजून घेताना