आनंदी जीवन
आनंदी जीवन जगी सर्व सुखी असा कोण आहे lविचारी मना तूच शोधूनी पाहेl संत रामदास स्वामी. जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख असते. परंतु प्रत्येक माणसाला जीवनामध्ये मात्र सुखाचे अपेक्षा असते दुःख जीवनात कोणालाही नको असते. परंतु मानवी जीवन म्हणजे सुख आणि दुःख यांच्या धाग्याने विणलेला मानवी रुमाल आहे असे म्हटले जाते. सुख म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा यांच्यानुसार जीवनामध्ये जीवन जगणे परंतु याच अपेक्षांच्या विरुद्ध जीवनात जीवन जगावे लागले तर माणसाला दुःख झाले असे वाटते. परंतु मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असते. अनेक महापुरुष साधुसंत यांना सुद्धा जीवनामध्ये संकटांचा दुःखाचा सामना करावा लागला. प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षे वनवासात जावे लागले भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोठडीमध्ये झाला संत ज्ञानेश्वरांना लोकांनी त्रास दिला सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर लोकांनी चिखल शेणाचा मारा केला संत तुकारामांच्या गाथा याच दुष्ट लोकांनी इंद्रायणी मध्ये बुडवल्या. अशाप्रकारे अनेक संत ,महापुरुष ,जीवात्मा यांना प्रत्येकाला दुःखाचा सामना करावा लागत असतो. परंतु मिळालेले दुःख हे दुःख न मानता त्य...
Comments
Post a Comment